घरक्रीडानेमकं खातं कोण उघडणार? राजस्थान रॉयल की आरसीबी?

नेमकं खातं कोण उघडणार? राजस्थान रॉयल की आरसीबी?

Subscribe

आजच्या सामन्यात आरसीबी आणि राजस्थान रॉयल यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात नेमकं कोण जिंकणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे.

आज रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि राजस्थान रॉयल यांच्यात सामना रंगणार आहे. सीझनमधला हा १४ वा सामना असणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाना विजयाची नितांत आवश्यकता असणार आहे. कारण या दोन्ही संघानी १२ व्या सीजनमध्ये आपलं विजयाचं खातं उघडलेलं नाही. १२ व्या सीझनमध्ये या दोन्ही संघाचे प्रत्येकी तीन सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या पदरात अपयश पडलं आहे. मुंबई सोबतची खेळी वगळता बंगळुरुची फार काही मोठी कामगिरी झालेली नाही. बंगळुरुने तर पराभवाचा विक्रमी रेकॉर्ड केला. चेन्नई विरोधात खेळताना बंगळुरुने अवघ्या ७० धावांवर आपला गाशा गुंडाळला होता. त्यामुळे चेन्नईने बंगळुरुने सहज बाजी मारली. सनराईज हैदराबाद सोबतही बंगळुरुची अशीच नाचक्की झाली होती. सनराईज हैदराबादने बंगळुरुसमोर २३२ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, हे आव्हान पेलण्यात बंगळुरुचा संघ अपयशी ठरला. अवघ्या ११३ धावांमध्ये बंगळुरुचे सर्व गडी तंबूत परतले आणि हैजराबादचा विजय झाला. मुंबईने बंगळुरुला टफ दिलं होतं. परंतु, तरीही बंगळुरुला अपयश आलं.

राजस्थान रॉयलची बात करायची झाली तर राजस्थानने तिनही सामन्यात म्हणजे पंजाब, चेन्नई आणि हैदराबाद विरोधात खेळताना आक्रमक खेळी केली. परंतु, शेवटच्या क्षणात डाव निसटला. राजस्थान संघाचा आक्रमकपणा शेवटपर्यंत टिकत नाही. त्यामुळे राजस्थानच्या हातात आलेला सामना सूटतो.

- Advertisement -

दरम्यान, राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. यापैकी ८ सामने बंगळुरु तर ९ सामने राजस्थानने जिंकले आहेत. उरलेल्या २ सामन्यांचा निकाल लागला नव्हता. आजचा सामना राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. याअगोदर राजस्थान आणि बॅगलोरमध्ये ६ सामने हे सवाई मानसिंग स्टेडिअमवर खेळली गेली आहेत. या सहाही सामन्यात दोन्ही संघांना फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले आहे.

राजस्थानचे खेळाडू

१) जोस बटलर
२) अजिंक्य रहाणे
३) संजू सैमसन
४) स्टीव स्मिथ
५) बेन स्टोक्स
६) राहुल त्रिपाठी
७) कृष्णप्पा गौथम
८) जोफ्रा आर्चर
९) श्रेयस गोपाल
१०) धवल कुलकर्णी
११) वरुण आरोन

- Advertisement -

बॅंगलोरचे खेळाडू

१) विराट कोहली
२) पार्थिव पटेल
३) एबी डिव्हिलियर्स
४) शिमरन हेटमायर
५) शिवम दुबे
६) मार्कस स्टोइनिस किंवा मोईन अली
७) वाशिंगटन सुंदर
८) टीम साउदी किंवा लेदर कोर्टनाईल
९) उमेश यादव
१०) मोहम्मद सिराज
११) युझी चहल

बॅंगलोरचे key plkayers

विराट कोहली
एबी डेव्हिलियर्स
मार्कस स्टोइनिस
लेदर कोर्टनाईल

राजस्थानचे key players

जोस बटलर
अजिंक्य रहाणे
संजू सैमसन
स्टीव स्मिथ
बेन स्टोक्स

बंगळुरुचं नेमकं चुकतं कुठं?

  • बॅंगलोरकडे चांगल्या खेळाडूंची फळी आहे. तरीदेखील बॅंगलोर आयपीएलच्या १२ व्या संघात गेल्या तिन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे बॅंगलोरने आत्मपरिक्षण करणं फार गरजेचं आहे. विराट कोहली सारखा कर्णधार असताना बॅंगलोरचा लाजिरवाना पराभव होतो. या सघाचे खेळाडू कधी धावा करताना धावबाद होतात. तर कधी झेलबाद होतात. त्यामुळे योग्य गॅप बघून फटकेबाजी केली. तर त्याचा चांगला फायदा बँगलोरला होऊ शकतो.
  • टीम साउदीचा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु, साउदीला तिन्ही सामन्यात संधी दिली गेली नाही.

राजस्थानचं काय चुकलं?

राजस्थान हा संघ पहिल्यापासून दमदार असा संघ राहिला आहे. राजस्थानच्या संघात शेम वॉटसन, शेन वॉर्न, राहुल द्रविड या सारखे दिग्गज खेळाडू होते. त्यामुळे राजस्थाने आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये जेतेपद मिळवले होते. सध्या वॉर्न आणि द्रविड हे दोघे या संघासाठी मार्गदर्शकची भूमिका बजावताना दिसत आहेत. राजस्थानची महत्त्वाची चुक अशी की, त्यांचा उत्साह सामना सुरु झाल्यावर चांगला असतो. परंतु., जसजसा सामना पुढे सरकतो, तसतसा त्यांचा उत्साह कमी होत जातो.

दोन्ही संघांच्या कर्णधारांची कारकिर्दी?

अजिंक्य रहाणे :

२०१२ मध्ये अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. २०१८ पासून तो राजस्थान रॉयलसाठी खेळू लागला. तो सध्या राजस्थान संघाचा कर्णधार म्हणून भूमिका निभावत आहे.

विराट कोहलीने :

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा – ५०००
चौकार – ४२४
षटकार – १७८
शतक – ४
अर्धशतक – ३४

दोन्ही संघांमध्ये काय फरक?

गेल्या सामन्यांमध्ये बॅंगलोरचा मुंबई वगळता एकतर्फी हार झाली आहे. तर राजस्थानने आक्रमक खेळी केली आहे. परंतु, शेवटच्या क्षणाला आक्रमकता कमी झाल्यामुळे राजस्थानचा पराभव झाला आहे.

सवाई मैदानावर कोण जिंकणार?

सवाई मैदानावर आतापर्यंत ४१ सामने झाले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ १७ सामने जिंकला आहे. तर प्रथम गोलंदाजी करणारे संघ २६ सामने जिंकला आहे. या स्टेडियमचा इतिहास पाहता गोलंदाजी की फलंदाजीचे निवड करणं म्हत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -