घरमुंबईअमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना फ्रेण्डशिप डेच्या दिल्या 'ग्लॅमरस' शुभेच्छा!

अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना फ्रेण्डशिप डेच्या दिल्या ‘ग्लॅमरस’ शुभेच्छा!

Subscribe

फ्रेण्डशिप डेच्या दिवशी राज्याच्या राजकीय वर्तुळातलं सर्वात ग्लॅमरस दाम्पत्य असलेल्या अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांना फ्रेण्डशिप डेच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे ‘फ्रेण्डशिप डे’! मुंबई आणि आसपासच्या परिसरात जरी पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी देशाच्या इतर भागांमध्ये फ्रेण्डशिप डेचा उत्साह विशेषत! तरुणाईमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्रात देखील असे स्पेशल फ्रेण्ड्स आहेत, ज्यांच्यासोबत ग्लॅमर तर आहेच, पण त्याशिवाय एक वेगळं नातं देखील आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात जरी पती-पत्नीचं नातं असलं, तरी अमृता फडणवीस यांनी मात्र देवेंद्र फडणवीसांना फ्रेण्डशिप डेच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत! त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून
त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे त्यांच्या फोटोशूटमधले काही फोटो शेअर केले आहेत. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात…

माझ्यासमोर चालू नको, मी कदाचित तुझ्या मागून येणार नाही…माझ्या मागेही उभा राहू नको, मी कदाचित तुझं नेतृत्व करणार नाही…फक्त माझ्या सोबत चाल..आणि माझ्या मित्र बनून राहा…हॅपी फ्रेण्डशिप डे!

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयानेही लाइक केलं ट्वीट!

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं सर्वात ग्लॅमरस राजकीय दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. त्यातच अमृता फडणवीसांच्या ग्लॅमरमुळे या दोघांच्या बॉण्डिंगचे देखील बरेच चाहते आहेत. इतकंच काय, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयानं देखील अमृता फडणवीस यांचं हे ट्वीट लाइक केलं आहे! त्यामुळे त्यांच्या या ट्वीटची चर्चा सुरू झाली आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -