घरमुंबईसायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिद्रांचे ट्वीट, केली 'ही' प्रतिज्ञा

सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आनंद महिद्रांचे ट्वीट, केली ‘ही’ प्रतिज्ञा

Subscribe

मुंबई – अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष उद्योगपती सायरस मिस्त्री याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे अपघातात सायरस मिस्त्री यांच्या टोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळी त्यांचा मृत्यू झाला. सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबतच्यांच्या जीवावर बेतली. या बात आनंद महिंद्रां यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

ट्वीटमध्ये काय –

सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नसल्याची माहिती समोर आल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी मी यापुढे नेहमी सीट बेल्ट लावणार शी शपथ घेतली. गाडीच्या मागच्या सीटवर असतानाही मी नेहमी सीट बेल्ट लावण्याचा संकल्प करत आहे. तुम्ही सर्वांनी ही प्रतिज्ञा घ्या, असे मी आवाहन करतो, आपण आपल्या कुटुंबाला हे देणे लागतो, असे ट्विट आनंद महिद्रा यांनी केले आहे.

- Advertisement -

यामुळे मृत्यू –

सायरस मिस्त्रींच्या डोक्यावर मार बसला होता. मृत्यूचे कारणही तेच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. जहांगीर पंडोल यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दोघांना जेव्हा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा दोघांचाही मृत्यू झाला होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -