घरमुंबईअनिल देशमुखांची अटक अटळ? ईडीच्या कार्यालयात गैरहजर

अनिल देशमुखांची अटक अटळ? ईडीच्या कार्यालयात गैरहजर

Subscribe

स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि पीए कुंदन शिंदे या दोघांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. मात्र, देशमुख यांनी आपल्या वकिलामार्फत मला थोडा वेळ देण्यात यावा, अशी विनंती करीत शनिवारी ते ईडीच्या कार्यालयात आले नाही. पालांडे आणि शिंदे यांना झालेल्या अटकेनंतर देशमुख यांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीकडून शुक्रवारी दिवसभर अनिल देशमुख यांच्या निवास स्थानावर छापेमारी करण्यात आली. तसेच देशमुख यांची ७ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

वाझेने दिलेल्या जबाबात बार मालकांकडून वसुली करण्यात आल्याचे कबूल केले आहे आणि वसुलीची सर्व रक्कम कुंदन शिंदे याला दिल्याचे त्याने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाचा थेट संबंध अनिल देशमुख यांच्याशी असल्याच्या संशयावरून ईडीने शनिवारी देशमुख यांना समन्स पाठवून चौकशीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र, देशमुख यांनी ईडी कार्यालयात स्वतः हजर न राहता आपले वकील जयवंत पाटील यांना पाठवण्यात आले. वकील पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या मार्फत ईडीकडून वेळ वाढवून मागितला आहे. तसेचआम्हाला कोणत्या केसबाबत बोलावले आहे हे आम्हाला सांगितले नाही.आम्ही पेपर मागितले आहेत, असे देशमुख यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ईडीकडून अनिल देशमुख यांना दुसर्‍यांदा समन्स पाठवण्यात येणार असल्याची शक्यता असून सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याचवेळी अटक होईल, अशी शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -