घरमुंबईमुंबईकरांसाठी अक्वा लाईन

मुंबईकरांसाठी अक्वा लाईन

Subscribe

मुख्यमंत्र्याकडून मेट्रो- ३ डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण

मेट्रो-३ च्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (मुं.मे.रे.कॉ) मेट्रो-३चे डब्बे बनविण्याचे काम अँलस्टाँम ट्रान्स्पोर्ट इंडिया या कंपनीला दिलेले आहे. मेट्रो-३ या संपूर्णतः भूमिगत मेट्रो मार्गिकेला अ‍ॅक्वा लाईन असे संबोधले जाणार आहे. या डब्यांची रंगसंगती तसेच डब्यांची आंतर-बाह्य संरचना हा नावाला सुयोग्य अशी करण्यात येणार आहे. मेट्रो -३ मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ गाड्या अँलस्टाँम या कंत्राटदाराद्वारे बनविण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-३च्या सर्व गाड्यांची निर्मिती अँलस्टाँम इंडिया यांच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो-३च्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण होणे हा आमच्यासाठी आनंदाचा प्रसंग आहे. मेट्रो-३च्या डब्यांच्या निर्मितीस नोव्हेंबर २०१९ पासून सुरुवात होणार असून पहिली गाडी एका वर्षाच्या आत मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे” अशी प्रतिक्रिया एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिक अश्विनी भिडे यांनी दिली.

म्हणूनच अ‍ॅक्वा लाईन

मुंबईचा समुद्र आणि वाहत्या पाण्याचा ताजेपणा आणि गती या पासून प्रेरणा घेऊन या डब्यांची रंगसंगती ठरविण्यात आली आहे. यामध्ये फिका हिरवा ( अ‍ॅक्वा ग्रीन) आणि फिका पिवळा (बेज) या रंगाचा वापर करण्यात आला आहे. त्यापैकी हिरवा रंग समुद्राच्या लाटांचा प्रवाहिपणा, ताजेपणा आणि गती तसेच पिवळा रंग हा आरामदायी प्रवासाचे प्रतीक आहे. मेट्रो-३द्वारे प्रवाशांना आरामदायी सुखकर, वेगवान व शाश्वत सेवा मिळणार आहे. कार्यान्वित झाल्यावर मेट्रो-३ मुंबईची नवीन जीवनवाहिनी ठरणार आहे, असा विश्वास एमएमआरसीने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -