घरक्रीडाफेडररला पराभवाचा धक्का

फेडररला पराभवाचा धक्का

Subscribe

सिनसिनाटी मास्टर्स टेनिस

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररला सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत ७० व्या स्थानी असणार्‍या रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हने त्याला ६-३, ६-४ असे पराभूत केले. सातवेळा सिनसिनाटी मास्टर्स जिंकणार्‍या ३८ वर्षीय फेडररचा हा या स्पर्धेतील केवळ दहावा पराभव होता, तर ४७ सामने त्याने जिंकले आहेत. रुब्लेव्हविरुद्ध हा त्याचा पहिलाच सामना होता. २१ वर्षीय रुब्लेव्हला दुखापतीमुळे मागील मोसमात बरेच महिने टेनिस कोर्टबाहेर रहावे लागले होते. मात्र, फेडररविरुद्धच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट खेळ केला.

रॉजरसारख्या महान खेळाडूविरुद्ध सामना खेळायला मिळणे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. या सामन्यात स्टेडियममधील जवळपास ९९ टक्के प्रेक्षक त्यालाच पाठिंबा देत होते. मी या सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला खूप चांगली झुंज दिली, असे सामन्यानंतर रुब्लेव्ह म्हणाला.

- Advertisement -

फ्रांसच्या रिचर्ड गॅस्केने दिएगो श्वाट्झमनचा ७-६, ६-३ असा पराभव करत, तर जपानच्या योशिहिटो निशिओकाने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनौरचा ७-५, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये अव्वल सीडेड अ‍ॅश बार्टीने इस्टोनियाच्या अ‍ॅनेट कोंटावीतवर रंगतदार सामन्यात ४-६, ७-५, ७-५ अशी मात करत या स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -