घरमुंबईउत्तर वसईत सोनसाखळी चोरांची दहशत

उत्तर वसईत सोनसाखळी चोरांची दहशत

Subscribe

ग्रामस्थांना द्यावा लागतो पहारा

उत्तर वसईत सोनसाखळी चोरांनी दहशत माजवली असून,या चोरांना अटकाव करण्यात पोलिसांना यश येत नसल्यामुळे पहारा देण्याची पाळी ग्रामस्थांवर आली आहे.

उत्तर वसईच्या नंदाखाल परिसरात सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातला आहेत. या चोरांकडून मध्यमवयीन महिलांनाच लक्ष केले जात असल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या पाच महिन्यात या परिसरात सोनसाखळी खेचण्याचे 10 प्रकार घडले आहेत. लाखो रुपयांचे दागिने चोरटे हातोहात लुटून नेत असताना पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. रविवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात येणार होता. या सोनसाखळी चोरांच्या अनेक तक्रारी असतानाही एकालाही पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे तरुण ग्रामस्थांना ठिकठिकाणी पहारा द्यावा लागत आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या या निष्क्रियतेवर भूमिका घेण्यासाठी ग्रामस्थांनी एक चौक सभाही आयोजित केली होती. माजी सभापती डॉमनिक रुमाव, कॅथलिक बँकेचे संचालक पायस मच्याडो, जॉन परेरा, कॅलीस ब्रास, प्रा. विंसेट परेरा, रॉजर रॉड्रीग्ज या सभेला उपस्थित होते.रविवारच्या मोर्च्यासाठी गावागावात जनजागृती सभा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -