घरUncategorizedप. बगालमधील बडी हस्ती एटीएसच्या ताब्यात

प. बगालमधील बडी हस्ती एटीएसच्या ताब्यात

Subscribe

बुधवारी कोर्टात  करणार हजर? नालासोपारा  शस्त्रसाठा प्रकरण याबाबत एटीएसचे  प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी फोन किंवा एसएमएसवर संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

श्रीकांत पांगारकरकडून स्फोटकांसाठी अर्थसहाय्य 

या प्रकरणात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना  स्फोटकांसाठी अर्थसहाय्य केल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. तपासादरम्यान एटीएसने चौघांचीही बँक खाती तपासण्यात आली तेव्हा जालनाचे नगरसेवक श्रीकांत पांगारकर हा त्यांना पैसे पुरवायचा हे उघड झाले. दरम्यान श्रीकांत पांगारकर हा २००१ पासून २०१० या कालावधीत शिवसेनेचा नगरसेवक होता; पण त्याने शिवसेना सोडल्यानंतर गेल्या ४ ते ५ वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी संघटनेबरोबर काम करायला सुरुवात केली होती. सध्या पांगारकर अटकेत आहे.
कर्नाटक एटीएसने उघड केलेल्या नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणाचे धागेदोरे आता पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या प.बंगालमधील एका बड्या हस्तीच्या एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. दहशतवादविरोधी पथकाने या बड्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यापासून कटाचे धागेदोरे उघड होऊ लागले आहेत. या प्रकरणातील म्होरक्यांच्या प्रशिक्षणाची सारी व्यवस्था या व्यक्तीकडून झाल्याचा दावा एटीएसच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या व्यक्तीला मुंबईत बुधवारी कोर्टात हजर करणार असल्याचे समजते.
एटीएसच्या या कारवाईमुळे शस्त्रसाठ्याच्या या प्रकरणाची पाळेमुळे राज्याच्या बाहेरदेखील पसरली असल्याचे उघड होऊ लागले आहे. पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती त्या राज्यातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखली जाते. या व्यक्तीकडून अनेक गोष्टींचा खुलासा झाला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात राज्यभरातून आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आलेली असून, यापैकी निम्म्याहून अधिक आरोपींना या व्यक्तीने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचे कर्नाटक एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. नालासोपारामधील भंडार आळी येथे दीड महिन्यांपूर्वी एटीएसने छापा टाकून काही शस्त्रे आणि बॉम्ब तसेच बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करून वैभव राऊत नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. ही कारवाई कर्नाटकच्या एटीएसने केली होती.
राऊतच्या अटकेनंतर याच प्रकरणात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती. ६ सप्टेंबर रोजी साकळी, जळगाव येथून वासुदेव भगवान सूर्यवंशी याला ताब्यात घेण्यात आले. दुसर्‍याच दिवशी याच गावातील लोधी वाड्यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी यालाही अटक करण्यात आली होती. या सर्वांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा ठावठिकाणा घेण्यासाठी एटीएसने विशेष मोहीम हाती घेतली तेव्हा याचे धागेदोरे महाराष्ट्र आणि कर्नाटकबाहेर म्हणजेच पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले असल्याचे उघड झाले.
अटक केलेल्या तीन आरोपींकडून बॉम्ब बनवण्याची पुस्तके जप्त करण्यात आली होती. या पुस्तकांमध्ये बॉम्ब कसा बनवायचा, लक्ष्य कसे निश्चित करायचे आणि लक्ष्यावर बॉम्ब लावल्यावर पुढे कोणती काळजी घ्यायची, याबाबतच्या सूचनांचा समावेश त्यात असल्याची माहिती पुढे आली होती. आरोपींकडील माहितीनुसार ही पुस्तके पश्चिम बंगाल येथून पुरवण्यात आल्याचे पुढे आले. तेव्हा एटीएसने याचा माग घेतला तेव्हा ही मोठी व्यक्ती असल्याचे उघड झाले. एटीएसने प.बंगालमध्ये जाऊन या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. त्यानेही आपला सहभाग एटीएस अधिकार्‍यांकडे उघड केल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तीकडे काही कागदपत्रेही आढळली होती.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त केलेली शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा तपशीलही प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.  10 गावठी पिस्तूल मॅगझीन, 1 गावठी कट्टा, 1 एअर गन, 10 पिस्तूल बॅरल, 6 अर्धवट तयार पिस्तूल, 6 पिस्टल मॅगझीन, 3 अर्धवट तयार मॅगझीन, 7 अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, 16 रिले स्विच, 6 वाहनांच्या नंबर प्लेट्स, 1 ट्रिगर मॅगझीन, 1 चॉपर आणि एका स्टील चाकूचाही या हत्यारांचा यात समावेश आहे.
साकळीतून ज्वालाग्राही  पदार्थ जप्त 
एटीएसकडून न्यायालयात देण्यात आलेल्या माहितीनुसार, साकळी गावातून ताब्यात घेण्यात आलेल्या विजय ऊर्फ भय्या लोधी याच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, ३ मोबाईल, ४ पेनड्राईव्ह आणि दुचाकीच्या काही नंबरप्लेट जप्त करण्यात आल्या. तर वासुदेव सूर्यवंशी याच्याकडून १ डीव्हीडी आणि २ मोबाईल जप्त करण्यात आले होते.
विशेष प्रशिक्षण गोव्यात
स्फोटके बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि श्रीकांत पांगारकर हे देशातल्या विविध ठिकाणी फिरले असून, यातल्या काही जणांना वेगवेगळ्या ठिकाणी विशेष प्रशिक्षण देण्यात आले.   या प्रशिक्षण केंद्रांमध्ये विशेष केंद्र हे गोव्यात असल्याचेही एटीएसच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे ज्या संस्थेसाठी हे काम करतात त्या संस्थेचे मुख्यालयही गोव्यात आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -