घरमुंबईकोरोनाने निधन झालेल्या बांधकाम व्यवसायिकांच्या खात्यातुन कोट्यवधी रुपये लुटण्याचा प्रयत्न

कोरोनाने निधन झालेल्या बांधकाम व्यवसायिकांच्या खात्यातुन कोट्यवधी रुपये लुटण्याचा प्रयत्न

Subscribe

या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.

कोरोना या आजाराने निधन झालेल्या एका बांधकाम व्यवसायिकाच्या बँक खात्यातुन कोट्यवधी रुपये दुसऱ्या खात्यावर वळते करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौकडीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौकडीपैंकी एक जण या बांधकाम व्यवसायिकांच्या कंपनीत नोकरी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शकील मेहमूद शेख, अर्शद रफिक सय्यद, प्रितेश उर्फ पिंटू मांडलीया आणि स्वप्नील ओगलेकर असे अटक करण्यात आलेल्या चोघांची नावे आहेत.

या टोळीतील तिघेजण सराईत सायबर गुन्हेगार असून त्यापैकी एक जण परदेशात बँकेत नोकरीला होता, व नुकताच तो मुंबईत आला होता. या टोळीने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकांना ऑनलाईन गंडा घातला आहे. दहिसर येथील एका झोपडपट्टीत या टोळीने एक घर भाडेतत्वावर घेतले होते, त्याच घरातून ते अनेकांची ऑनलाईन फसवणूक करीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

Four arrested

पश्चिम उपनगरातील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाचे कोरोना या आजाराने निधन झाले होते. त्याच्या मागे त्याची पत्नी असून ती देखील आजारी असते. या व्यवसायिकाचा सर्व व्यवहार त्याचा मॅनेजर पहतो. गेल्या आठवड्यापूर्वी बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयातून धनादेश, तसेच इतर महत्वाचे कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार मॅनेजर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दिलेली होती. दरम्यान दहिसर येथील एका झोडपट्टीतील एका खोलीत काही इसम संशयास्पदरित्या राहत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळाली. आढाव यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याजवळील लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आले. या तिघांच्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली. या तिघांनी तसेच कोरोनाने निधन झालेल्या व्यवसायिकाकडे नोकरी करणाऱ्या स्वप्नील ओगलेकर याच्या मदतीने बांधकाम व्यवसायिकांचे कागदपत्रे मिळवून त्या कागदपत्रापासून बनावट कागदपत्रे तयार करून बांधकाम व्यवसायिकाच्या विविध बँक खात्यातील कोट्यवधी रुपये स्वतःच्या खात्यावर वळते करणार होते अशी माहिती चौकशीत समोर आली.

- Advertisement -

गुन्हे शाखेने कर्मचाऱ्यासह चौघांना अटक करून त्याच्या विरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असल्याची माहिती वपोनि चिमाजी आढाव यांनी दिली, तसेच या टोळीवर मीरा रोड, ठाणे आणि मुंबईत सायबर गुन्ह्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आढाव यांनी दिली आहे.


हेही वाचा – १०३ वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवलं; नुकतंच केलं होतं पाचवं लग्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -