घरमुंबईजलमापके स्वयंचलित, मापन जुन्याच पध्दतीने

जलमापके स्वयंचलित, मापन जुन्याच पध्दतीने

Subscribe

स्वयंचलित जलमापके बसवूनही ३१ टक्के बिले अंदाजेच

मुंबईकरांना पुरवठा करण्यात येणार्‍या पाण्याची बिले ही ५० टक्के अंदाजितपणे आकारली जात असल्याच्या तक्रारी होत असल्याने याचे अचुक मापन करण्यासाठी महापालिकेने स्वयंचलित जलमापके (एएमआर मीटर)बसवण्यात आली. परंतु ही जलमापके बसवण्यात आल्यानंतरही त्यातील केवळ ६९ टक्केच जलमापके चालू स्थितीत असल्याची बाब समोर आली आहे. मात्र उर्वरीत जलमापके कार्यरत तसेच काही अडचणीमुळे वाचनास उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्वयंचलित जलमापके असली तरी त्याचे वाचन मात्र जुन्याच पध्दतीने करावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

मुंबईतील पाण्याचे अचुक मापन जुन्या जलमापकांमुळे करता येत नसल्यांमुळे मागील दहा वर्षांपूर्वी स्वयंचलित जलमापके बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईतील जलजोडण्यांवर ९४ हजार ७७७ जलमापके बसवण्यात आली आहेत. परंतु यांचे वाचन स्वयंचलित पध्दतीने होत नसल्याची माहिती खुद्द जलअभियंता विभागाने दिली आहे. जलजोडण्यांवर बसवण्यात आलेल्या या जलमापकांपैकी ६९ टक्केच जलमापके चालू स्थितीत असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

सध्या या जलमापकांपैकी १८ टक्के जलमापके कार्यरत नाहीत, तर ९ टक्के काही अडचणींमुळे वाचनास उपलब्ध नाहीत तर ४ टक्के जलमापकांचे वाचन प्रशासकीय अडचणींमुळे शक्य होत नाहीत. मात्र,आजमितीस २१ हजार ४०९ जलमापके बसवण्याचे काम शिल्लक आहे. विभाग कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार हे जलमापके बसवण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी अर्थसंकल्पावरील अनौपचारिक चर्चेत उपस्थित केलेल्या मुद्दयाला जलअभियंता विभागाने हे उत्तर देतानाही ही माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेने हे जलमापके बसवण्याची कार्यवाही सुरु केल्यानंतर झोपडपट्टी परिसरात त्यांची चोरी होवू लागली. त्यामुळे अतिमहागडे जलमापके बसवण्याऐवजी वेगळ्याप्रकारची जलमापकांची खरेदी झोपडपट्टी परिसरासाठी करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -