घरमुंबईवेळ वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालू नका

वेळ वाचविण्यासाठी जीव धोक्यात घालू नका

Subscribe

आरपीएफकडून मानखुर्द स्थानकात विशेष मोहीम

उपनगरीय लोकल प्रवास हा दिवसेंदिवस धोक्याचा होत आहे. प्रवासी काही मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी सर्रास शॉर्टकट मारण्याचा नादात रेल्वे ट्रॅक ओलांडतात.अनेकदा येणार्‍या लोकलचा अंदाज न आल्याने लोकलची धडक बसून प्रवाशांच्या जागीच मृत्युमुखी पडण्याचा घटना वाढत जात आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या सुध्दा डोकेदुखीत वाढत होत आहे. यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, असा संदेश देण्यासाठी आता आरपीएफ पोलिसांकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.मानखुर्द स्थानकात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकात ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडण्यापासून परावृत्त करण्यात आले.तसेच प्रवाशांना पादचारी पुलांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानातंर्गत चालू वर्षामध्येआतापर्यंत २८४ जणांना रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वे नियमानुसार पकडण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली आहे.

६०० कोटी रुपयांची तरतूद
रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेने दोन स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारण्यावर भर दिलेला आहे.तसेच रेल्वे रुळांशेजारी संरक्षक भिंत देखील उभारण्यात येत आहे. एमयुटीपी ३ अंतर्गत रेल्वे रुळ ओलांडताना होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

रेल्वे रूळ ओलांडण्यामागे शॉर्टकट घेण्याचा मोह अपघाताकडे घेऊन जातो हे माहीत असूनही त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान, रेल्वे पोलिसांकडून हार्बर रेल्वेवर राबवण्यात आलेल्या उपक्रमातून चालू वर्षात २८४ प्रवाशांची रेल्वे रूळ ओलांडत असताना धरपकड करत त्यांचावर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच ‘रेल्वे रूळ ओलांडू नका, पादचारी पुलाचा वापर करा’ असे आवाहन रेल्वे स्थानक परिसरात तसेच आजूबाजुच्या झोपडपट्टीत करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -