घरमुंबईपश्चिम रेल्वे स्थानकांवर १६ एक्सलेटर,५ लिफ्टची पडणार भर

पश्चिम रेल्वे स्थानकांवर १६ एक्सलेटर,५ लिफ्टची पडणार भर

Subscribe

प्रवाशांना मिळणार दिलासा

रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वे स्थानकांवर येत्या काही महिन्यात एक्सलेटर आणि लिफ्टची संख्या वाढणार आहे. त्यामध्ये १६ एक्सलेटर आणि ५ लिफ्टची भर पडणार आहे.त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वे स्थानकातील पादचारी पूल चढताना-उतरताना ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग आणि महिला प्रवाशांंना गर्दीचा सामना करावा लागतो. तसेच त्रासदेखील सहन करावा लागतो. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी स्थानकांमध्ये एक्सलेटर आणि लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवर ३२ एक्सलेटर आणि १८ लिफ्ट लावण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे.स्थानकांवर एक्सलेटर आणि लिफ्ट प्रवासी सुविधांतर्गत बसविण्यात येत आहेत. तसेच याव्यतिरिक्त २० एक्सलेटर आणि ५४ लिफ्ट बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

जुलै २०१३ मध्ये विलेपार्ले स्थानकात पहिला एक्सलेटर लावण्यात आला होता. या मध्ये मालाड स्थानकात ३, लोअर परेल-मिरा रोड-नालासोपारा आणि विरार स्थानकात प्रत्येकी २, खाररोड-सांताक्रूझ-जोगेश्वरी-बोरीवली-दहिसर स्थानकात प्रत्येकी १, तर अंधेरी-बोरीवली-विरार स्थानकात प्रत्येकी १,अशा लिफ्ट लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकातील पादचारी पूल चढताना-उतरताना ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग आणि महिला प्रवाशांंना मोठा फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -