घरमुंबईठाण्यातील हॉटेल्स, इमारतींमध्ये ख्रिसमस पार्ट्या

ठाण्यातील हॉटेल्स, इमारतींमध्ये ख्रिसमस पार्ट्या

Subscribe

ख्रिसमस अर्थात नाताळ आज जगभरात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने मागील आठवड्यापासूनच ठाण्यातील बाजारपेठा फुलल्या होत्या. या निमित्ताने सांताक्लॉजच्या टोप्या, ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य, केक आणि मिठाई खरेदी करण्यासाठी सध्या ठाण्यातील बाजार आणि मॉलमध्ये गर्दी दिसत आहे. मंगळवारी ख्रिसमस निमित्ताने शहरातील सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे. तर ख्रिसमस निमित्ताने शहरातील विविध हॉटेलमध्येही जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

ख्रिसमसमध्ये येशूच्या जन्माला अनन्य साधारण महत्त्व आहे. उद्या दिवसभर यानिमित्ताने शहरातील चर्च, हॉटेल, वसाहती, शाळा-महविद्यालये इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह ओसांडून वाहत आहेत. नाताळ या ख्रिस्ती बांधवांच्या सणात अन्य धर्मीयदेखील आनंदाने सहभागी होत असतात. ख्रिस्ती बांधव घरोघरी येशू जन्माचे आकर्षक देखावे तयार करतात.

- Advertisement -

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चरई, वर्तकनगर, वसंत विहारसारख्या ख्रिस्तीबहुल परिसरांमध्ये इमारती आणि घरांवर रोषणाई करण्यात आली आहे. जागोजागी ख्रिसमस ट्री उभारून सजवण्यात आले आहेत. विवियाना, कोरम, आर मॉलसह अन्यही लहान-मोठ्या मॉलमध्ये देखावे उभारण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नातेवाईक आणि मित्र-मैत्रीणींना देण्यासाठी विविध भेटवस्तूंचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. नौपाडा, राम मारुती मार्गावरील दुकानांच्या दर्शनी भागांत, लाल, पांढर्‍या रंगांचे पोशाख, हुडी असलेले उबदार कपडे, पार्टी वेअर लावण्यात आले आहेत. प्लमकेक, रमबॉलकेक आणि मेचपेन यासारखे विविध केक आणि मिठाया बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मंगळवारी दिवसभर यानिमित्ताने बाजारात प्रचंड गर्दी होणार असल्याने व्यापाराही उत्साहात आहेत.

चर्चेकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन
ठाण्यातील सर्वात जुने चर्च सेंट जेम्स, सेंट जॉन बाप्टिस्ट जांभळी नाका येथील सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चमध्ये यानिमित्ताने सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर ठाणे कारागृह परिसरातील सेंट जेम्स चर्चतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिका यांना फळे तसेच भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबईतील अनाथ मुलांनादेखील भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -