घरमुंबईट्रॉमाकेअर अंधत्व प्रकरण; शिवसेनेने घेतली डॉक्टरांची बाजू

ट्रॉमाकेअर अंधत्व प्रकरण; शिवसेनेने घेतली डॉक्टरांची बाजू

Subscribe

ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर पाच जणांचे डोळे निकामी झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पालिका प्रशासनाने वैद्यकीय अधीक्षकांसह १० जणांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे. पण, संबंधित डॉक्टरांवरील कारवाईचा बडगा चुकीचा असल्याची पाठराखण शिवसेनेने केली असल्याचे समोर आले आहे.

पालिकेतील भ्रष्टाचार असो वा प्रशासनाचा हलगर्जीपणा नेहमीच प्रशासनाची पाठराखण करण्याचे काम सत्ताधारी शिवसेना करते. ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर पाच जणांचे डोळे निकामी झाल्याने पालिका प्रशासनाने वैद्यकीय अधीक्षकांसह १० जणांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे. पण, संबंधित डॉक्टरांवरील कारवाईचा बडगा चुकीचा असल्याचे सांगत शिवसेनेच्या आरोग्य समिती अध्यक्षा अर्चना भालेराव यांनी थेट डॉक्टरांची पाठराखण केली आहे.

कारवाईचा बडगा चुकीचा

पश्चिम उपनगरात जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये ४ जानेवारीला सात रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी पाच रुग्णांना दृष्टी गमावावी लागली. भाजपने हे प्रकरण स्थायी समिती आणि प्रशासनाच्या निर्दशनास आणून देत चौकशीची मागणी केली. यानंतर संबंधित दोषींवर कारवाईचे चक्र सुरु झाले. त्यापूर्वीच कुपर हॉस्पिटलने चौकशी करून वैद्यकीय अधिक्षकांसह १० जणांवर ठपका ठेवला. तर वैद्यकीय अधीक्षक एच. एस. बावा यांची चेंबूर येथील मॉ रुग्णालयात बदली केली. डोळे गमावणे ही गंभीर घटना असून संपूर्ण घटनेची फेरचौकशी करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना दिले. तसेच दोषींवर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्याच्या सुचना दिल्या. मात्र हा कारवाईचा चुकीचा बडगा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

‘म्हणणं ऐकून न घेताच कारवाई केली’

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका आणि विद्यमान आरोग्य समिती अध्यक्षा अर्चना भालेराव यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांवरील कारवाई चुकीची ठरवत डॉक्टरांची पाठराखण केली, असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. ३० जानेवारीला झालेल्या घटनेची वस्तूस्थिती जाणून घेतली. मुळात शस्त्रक्रिया केलेल्या प्रभारी डॉक्टरांवर कारवाई करायला हवी होती. पण, या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या के.ई. एम हॉस्पिटलमधील नेत्रचिकिस्ता विभागाचे संबंधित वैद्यकीय प्रमुखांनी महापालिकेच्या आस्थापनांमधील वैद्यकीय अधिक्षक डॉ. हरबन्स सिंग बावा आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. ही कारवाई करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय अधिक्षक (प्रभारी), मेट्रन, सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. परंतु, तसे न करताच अहवाल तयार केल्याचे भालेराव यांनी म्हटले आहे.


वाचा – बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर अंधत्व प्रकरण – दोषींवर खटले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -