घरमनोरंजनसईच्या 'नो मेकअप' लूकसह ‘पाँडीचेरी’चं पोस्टर रिलीज

सईच्या ‘नो मेकअप’ लूकसह ‘पाँडीचेरी’चं पोस्टर रिलीज

Subscribe

पोस्टरवरील सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट आणि नो मेकअप लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.

मोबाईलमुळे जग खूप जवळ आलं आहे. फोटो, व्हिडिओ एडिटींगसाठी मोबाईलचा सर्रास वापर केला जातो. मात्र, मोबाईलचा किती मोठ्या स्तरावर उपयोग केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाँडीचेरी हा चित्रपट. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर शूट केला जाणार आहे. १ फेब्रुवारी म्हणजे आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. पाँडीचेरी या चित्रपटाचे चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणाआधीच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं आहे. या पहिल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांचा वेगळा लूक दिसत आहे. पोस्टरवरील सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट आणि नो मेकअप लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, सचिन आणि सई यांची हा एकत्र दूसरा चित्रपट आहे. याआधी सईने सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार चित्रपटामध्ये काम केले आहे.

पाँडीचेरी चित्रपटाचं पहिलं पोस्टर

ही पहिली फिल्म आहे जी आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. नो-मेकअप, नो-हेअरस्टाइल लूकमध्ये मी ह्यात दिसेन. संपूर्ण चित्रपट पाँडेचरीत चित्रीत होईल. सिनेमाची प्रोसेस मी एवढी एन्जॉय करतेय की, पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेला जात असल्यासारखी छान भावना आहे. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात अशी फिल्म यायला हवी, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्टझोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करता. त्यामूळे सध्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मी खूप उत्सुक आहे.– सई ताम्हणकर, अभिनेत्री

- Advertisement -

‘पॉंडिचेरी’ चित्रपटातील भूमिका चांगली वठवता यावी, यासाठी सईने १० ते १५ किलो वजनही वाढवले होते. सईचा नो-मेकअप रिएलिस्टिक लूक सईच्या ह्या नव्या भूमिकेविषयी उत्कंठा वाढवणारा आहे. त्यामुळे पाँडीचेरीविषयी सईच्या चाहत्यांना अधिक उत्सुकता लागून राहिली असणार हे नक्की. अभिनेत्री अमृता खानवलकरही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. अमृताने काही दिवसांपूर्वी पाँडीचेरी चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Finally sharing the news of my first marathi film for the next year @Regrann from @kundalkar – This talented girl joins our film Pondicherry . Our next , to be shot entirely on smartphone . Happy to have you on board Amruta . The casting call thus gets over with three wonderful actors ready to jump into the dynamic process of shooting this film where camera will be almost invisible and the city is the fourth character. सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी ह्यांच्यासोबत अमृता खानविलकर “पाँडिचेरी” ह्या चित्रपटात तीसरी महत्वाची भूमिका साकारणार . अमृताचे मनापासून स्वागत . कास्टिंग ची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद ! @amrutakhanvilkar @saietamhankar @vaibhav.tatwawaadi

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -