घरमुंबईभारत बंद : मुंबईत कोणत्या सेवांवर होणार परिणाम, कोणत्या सेवा सुरळीत सुरू...

भारत बंद : मुंबईत कोणत्या सेवांवर होणार परिणाम, कोणत्या सेवा सुरळीत सुरू राहणार ?

Subscribe

नव्या कृषी विधेयकाला भारत बंदचे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडातील राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी या ८ डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. पण मुंबईच्या रस्त्यावर सेवा देणाऱ्या ऑटोरिक्षा, टॅक्सी, बेस्ट बसची सेवा मात्र सुरूच राहणार आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी संघटनांकडून भारत बंदमध्ये बेस्ट बसेस भारत बंदच्या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर ऑटोरिक्षा – टॅक्सी संघटनांकडूनही याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. संपुर्ण भारतभरात वाहतूकीच्या सेवा पुरवणाऱ्यांची एक व्हर्च्युअल बैठक आज पार पडली. त्यामध्ये अनेक वाहतूक संघटना आणि असोसिएशनमार्फत या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक सेवा पुरवठादार आपल्या गाड्या रस्त्यावर काढणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच शिरोमणी अकाली दलाने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पण या भेटीनंतर शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. शिवसेना संपात सहभागी होणार असल्यामुळेच मुंबईकरांनी या गोष्टीचा धसका घेतला आहे. पण मुंबईतील महत्वाच्या वाहतूकीच्या सुविधा सुरू राहणार असल्यानेच आता मुंबईकरांवरील ताण थोडासा हलका झाला आहे.

- Advertisement -

ऑटोरिक्षा, टॅक्सी, बेस्टची सेवा

मात्र मुंबईकरांची तारांबळ उडू नये यासाठीच मुंबईतील ऑटो रिक्षा टॅक्सी सेवा सुरूच राहणार असल्याची माहिती मुंबई ऑटोरिक्षामेन युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली. आम्ही संघटना म्हणून भारत बंदला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळेच नेहमीप्रमाणेच ऑटो आणि बसची सेवा सुरळीतपणे असेल असे त्यांनी सांगितले. तर मुंबई टॅक्सीमेन युनियनचे ए एल क्वाड्रोज यांनीही स्पष्ट केले की मुंबईच्या रस्त्यावर नेहमीप्रमाणेच टॅक्सी सेवा सुरू राहील. त्यामुळे संपाचा कोणताही परिणाम हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी याआधीच लोकल ट्रेनची सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळेच मुंबईकरांची सध्याची प्रवासाची भिस्त ही टॅक्सी, रिक्षा, बेस्ट बस आणि एसटीच्या बसच्या प्रवासावर आहे.

नवी मुंबई एपीएमसी

शेतकऱ्यांकडून आवाहन करण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) ची सेवादेखील बंद राहणार आहे. त्यामुळे या सेवेचा परिणाम हा मुंबईकरांच्या भाजीपाल्यावर होणार आहे. एपीएमसीचे राजेंद्र शेळके यांनी एपीएमसीची सेवा बंद राहील याबाबतची माहिती दिली.

- Advertisement -

वीज सेवा

तर मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांसाठी अखंडितपणे वीज सेवा सुरळीत राहिल अशी माहिती अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. भारत बंद दरम्यान आमची सेवा सुरळीतपणे सुरू राहील असे एईएमएलमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -