घरमुंबईBEST मधील कंत्राटी वाहक, चालकांचा तिसऱ्या दिवशी संप सुरूच, मुंबईकर त्रस्त

BEST मधील कंत्राटी वाहक, चालकांचा तिसऱ्या दिवशी संप सुरूच, मुंबईकर त्रस्त

Subscribe

मुंबईत रेल्वे पाठोपाठ सार्वजनिक व स्वस्त प्रवास देणाऱ्या बेस्ट उपक्रमात सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत काम बंद आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून याचा नाहक त्रास हा मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

मुंबई : मुंबईत रेल्वे पाठोपाठ सार्वजनिक व स्वस्त प्रवास देणाऱ्या बेस्ट उपक्रमात सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या आंदोलनाला 3 ते 4 बस डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. पण काल गुरुवारी जवळजवळ 8 ते 9 बस डेपोमधील कंत्राटी वाहक आणि चालक सहभागी झाले. ज्यामुळे अनेक मार्गावरील बसेसच्या फेऱ्या या रद्द करण्यात आल्या. परंतु आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून याचा नाहक त्रास हा मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. तर बेस्टला देखील याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. (BEST Contract transporters, drivers strike continue on third day, Mumbaikars suffer)

हेही वाचा – मुंबईतील ‘या’ आगारात आजही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, बेस्ट वाहतूक विस्कळीत

- Advertisement -

समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आझाद मैदानात बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासांठी आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर बस आगारातील 280 कंत्राटी कामगारांनी आझाद मैदान गाठले आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज जवळपास सर्वच कंत्राटी चालक आणि वाहक हे संपामध्ये सहभागी झालेले आहेत. तर, जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही आगारात जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.

या संपामध्ये आत्तापर्यंत देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतिक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील सर्वच कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता याचा सर्वाधिक फटका हा मुंबईकरांना बसत आहे.

- Advertisement -

‘या’ मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

1 ) बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे.
2) कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतन वाढ देणे.
3) बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत करणे.
4) प्रत्येक बसमार्गावर बसगाड्यांची संख्या वाढवून बसफेऱ्या वाढविणे.
5) नादुरूस्त बसगाड्या दुरुस्ती केल्याशिवाय मार्गस्थ न करणे.
6) मुंबईसाठी बेस्टचा स्वमालकीचा ताफा दुप्पट म्हणजेच किमान 6 हजार बसेसचा करणे.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या काम बंद आंदोलनाचा बेस्टच्या हजारो प्रवाशांना फटका बसल्याचे पाहायला मिळाला. तर कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे बेस्ट उपक्रम चांगलेच हादरले. बेस्टचे वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर लक्ष ठेवून असून कर्मचाऱ्यांशी व त्यांच्या संघटनेशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत बेस्ट प्रशासन प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र जर काम बंद आंदोलन करून बेस्टचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे न घेतल्यास व आंदोलन बेमुदत चालू ठेवल्यास बेस्ट प्रशासन त्याची गंभीर दखल घेईल व संबंधित कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या संघटनेवर कदाचित कडक कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -