घरमुंबईकामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडली

कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडली

Subscribe

सातवा वेतन लागू व्हावा या मागणीसाठी बेस्टचे कामगार मागील तीन दिवसांपासून वडाळा डेपोमध्ये उपोषण करत आहेत.

बेस्टच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून कामगार नेते शशांक राव हे उपोषण करत आहेत. पण आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना केईएम हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक २० मध्ये भरती करण्यात आले आहे. दरम्यान हक्काच्या मागणीसाठी बेस्टचे कामगार मागील तीन दिवसांपासून वडाळा डेपोमध्ये उपोषण करत आहेत.

हेही वाचा – अभिजित सामंत यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा

मागील तीन दिवसांपासून कामगारांचे उपोषण सुरुच

बेस्टच्या कामगारांना सातवा वेतन लागू करण्यात यावा यासाठी कामगार नेते शशांक राव हे मागील काही दिवसांपासून बेस्ट प्रशासनाशी वाटाघाटी करत आहेत. पण या वाटाघाटीतून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बेस्टच्या कामगारांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून बेस्ट कामकागारांनी वडाळा बस डेपोमध्ये उपोषण सुरु केले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांनीही कामगारांच्या मागणीला पाठींबा दर्शवण्यासाठी तसेच त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कामगारांच्या उपोषणात स्वतःसुद्धा सहभाग घेतला. उपोषण सुरु असतानाच आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना केईएम हॉस्पिटलमलध्ये वॉर्ड क्र. २० मध्ये भरती करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -