घरमुंबईनारा 'युती'चा पण मुलाखती सर्वच मतदारसंघात!

नारा ‘युती’चा पण मुलाखती सर्वच मतदारसंघात!

Subscribe

कल्याण-डोंबिवलीतून भाजपकडून २२ जण इच्छूक असून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या डोंबिवली मतदार संघातून चव्हाण यांच्याबरोबर पदाधिकारी महेंद्र रजपूत हे दोघेजण इच्छूक आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून सांगितले जात असले तरी दुसरीकडे सर्वच विधानसभा मतदार संघासाठी भाजपकडून मुलाखती सुरू आहेत. गुरूवारी कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदार संघासाठी भाजपकडून २२ जण इच्छूक आहेत. शिवसेनेकडून दावा करण्यात आलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १० इच्छूक आहेत. तर राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या डोंबिवली मतदार संघातून चव्हाण यांच्याबरोबर पदाधिकारी महेंद्र रजपूत हे दोघेजण इच्छूक आहेत.

22 candidates wants to stand for assembly election from bjp in kalyan-dombivli constituency

- Advertisement -

गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. गुरूवारी डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व या चार विधानसभा मतदार संघात इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांनी इच्छूकांशी संवाद साधला. चारही विधानसभा मतदार संघात २२ जण इच्छूक आहेत. त्याचा अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे सोपविण्यात आल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडूनच उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. गणपतीनंतर शिवसेनेसोबत जागा वाटपाबाबतची चर्चा होणार आहे. मात्र सगळया मतदार संघात मुलाखत घेणे ही स्वबळाची तयारी नसून, मित्रपक्षालाही याचा फायदा होऊ शकतो असेही ते म्हणाले. राज्यमत्री रविंद्र चव्हाण यांनी युती होणार असल्याचे संकेत दिले. तसेच कल्याण ग्रामीण हा मतदार संघ सेनेचे वाट्याला असून सुभाष भोईर हे आमदार आहेत. मात्र कल्याण ग्रामीण मतदार संघातूनही भाजपने मुलाखती घेतल्या. शिवाजी आव्हाड, नंदकिशार परब, डॉ. सुनीता पाटील, रोहिदास मुंडे, मोरेश्वर भोईर, निलेश पाटील, अॅड. आदेश भगत या ७ जणांनी इच्छूकता दर्शविली आहे.

हेही वाचा – ‘गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी’

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची हजेरी

कल्याण पश्चिमेत भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह नगरसेवक संदीप गायकर, नगरसेवक वरुण पाटील, साधना रवी गायकर, वैशाली पाटील, महेश जोशी, अर्जुन म्हात्रे, साईनाथ तरे, नगरसेवक अर्जुन भोईर, डॉ. चंद्रशेखर तांबडे असे तब्बल १० जण इच्छुक आहेत. हा मतदार संघ शिवसेनेला देण्यात यावा अशी सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळीच शिवसेनेने कल्याण पश्चिमेवर दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ तरे यांनी मुलाखतीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला जातो की भाजपला? तसेच इच्छूकांची संख्याही अधिक असल्याने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली जाते की पक्षनेतृत्व काही वेगळा विचार करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र हा मतदारसंघ भाजपचा असून कोणतीही तडजोड होणार नाही, असे राज्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

कल्याण पूर्व हा भाजपच्या वाट्यालाच

कल्याण पूर्वेतून अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २००९ च्या पहिल्या टर्ममध्ये ते आघाडीसोबत होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. भाजपचे सहयोगी आमदार म्हणूनच ओळखले जातात. गायकवाड यांना शिवसेनेत खेचण्यासाठी सेनेच्या नेतृत्चाकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र कल्याण पूर्व हा जागा वाटपात शिवसेनेला कि भाजपला जातेा याबाबत संभ्रमता आहे. मात्र गायकवाड हे भाजपच्या मुलाखतीत हजर राहून त्यांनी इचछूकता दर्शविल्याने कल्याण पूर्वेतून गायकवाड हे भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालय. गायकवाड यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे असे राजयमंत्री चव्हाण यांनी सांगितले. यावेळी कल्याण पूर्वेतून आमदर गायकवाड, विष्णू गायकवाड, हर्षल साळवी असे तीन जण इच्छूक आहेत. त्यामुळे हा मतदार संघ भाजपच्या वाटयाला जाणार हे जवळपास निश्चितच समजले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -