घरमुंबईबेस्ट कामगार, कुटुंबाचा शिवसेनेवर बहिष्कार

बेस्ट कामगार, कुटुंबाचा शिवसेनेवर बहिष्कार

Subscribe

निवडणुकीत शिवसेनाविरोधी मतदान

संप करूनही बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने तसेेेच वेळेवर पगार होत नसल्याने बेस्ट कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याचा निषेध म्हणून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या निवडणुकीत बेस्टमधील सत्ताधारी शिवसेनेला मतदान न करण्याचा निर्धार केला आहे. या निवडणुकीत शिवसेना विरोधी मतदान बेस्ट कर्मचारी करणार असल्याने महायुतीच्या उमेदवारांना याचा मोठा फटका बसणार आहे.

कुलाब्यापासून ते ओशिवरा गोरेगावपर्यंत कर्मचारी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेत. बेस्ट कर्मचार्‍यांचा विलंबाने होणारा पगार, कापण्यात येणारे भत्ते, अन्य सुविधा आदींना लागलेली कात्री आणि उपक्रम बंद करून खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा सुरू असलेला डाव यामुळे बेस्टमधील कर्मचारी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. बेस्ट कर्मचार्‍यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिलेली नाही. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बेस्टचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी शिवसेनेला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर्मचार्‍यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला पगार देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तरीही पगार देण्यासाठी दर महिन्याची 26 तारीख उजाडते. याचा सर्वात मोठा फटका विशेषत: बेस्ट चालक व वाहक यांना बसतो. घरात मुलांचे शिक्षण, कर्ज, घरातील दैनंदिन खर्च याचा ताळमेळ बसवताना बेस्ट कर्मचार्‍यांना खूप कठीण जात आहे. पगार वेळेवर होत नसल्याने बेस्ट कर्मचार्‍यांच्या बायकांना दुसर्‍याच्या घरातील कामे तसेच घरची धुणी-भांडी करण्याची वेळ आली असल्याने कर्मचार्‍यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

मदत करणार्‍या भाजपलाही फटका
बेस्टमधील काही समाजवादी पूर्वीपासून शिवसेना विरोधात आहेत. त्यांना आता या संपामुळे व बेस्टच्या आर्थिक स्थितीमुळे हाती कोलित मिळाले. हे समाजवादी लोकच आता शिवसेनेच्या नावाने कोल्हेकुई करत आहेत. परंतु जे बेस्टचे कर्मचारी नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतरही आमच्यासोबत राहिले. ते आमच्यासोबतच आहेत. ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बेस्टच्या संपाबाबत बोलाल तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना याचे श्रेय मिळू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अ‍ॅड. आशिष शेलार यांनी प्रयत्न करत त्यांना अप्रत्यक्ष मदत केली होती. त्याचा फटका आता त्यांनाही बसेल. परंतु जी परंपरागत मते शिवसेनेला मिळतील किंवा नाही हे २३ मेच्या निकालानंतरच कळेलच.
– सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -