घरलाईफस्टाईलपीसिओडीमध्ये घ्या काळजी

पीसिओडीमध्ये घ्या काळजी

Subscribe

‘पीसीओडी’ म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज हा स्त्रिया आणि मुलींच्या मनात न्यूनगंड निर्माण करणारा आजार. जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा सामना स्त्रियांना करावा लागत आहे. या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात आणि त्यामुळे मुख्यत: हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो. या आजारात चेहर्‍यावर मुरुमं येणे, केस गळण्याचं प्रमाण वाढणे, मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढणे आदी समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते.

अयोग्य जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव व ताणतणाव आदी कारणांमुळे महिलांना पीसिओडीसारख्या आजाराला सामोरे जावे लागते. या आजारावर मनाने कोणतेही उपाय न करता सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच या आजारांदरम्यान दिसणार्‍या चेहर्‍यावर मुरुमं येणे, केस गळण्याचं प्रमाण वाढणे, मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढणे आदी लक्षणांवर मात करण्यासाठी पुढील उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील.

- Advertisement -

मुरुमांवर मात करा – ‘पीसीओडी’ आजारादरम्यान महिलांना त्वचेवर येणार्‍या मुरुमांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या मुरुमांवर मात करण्यासाठी आज बाजारात विविध ब्रँड्सचे क्रीम उपलब्ध आहेत. त्वचारोगतज्ञाच्या सल्ल्याने योग्य क्रीमची निवड करावी.

पुदिन्याचा चहा प्या – ‘पीसीओडी’ आजारादरम्यान महिलांमध्ये अनावश्यक केस वाढीचे प्रमाण वाढते. त्यामुळे महिलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. अशावेळी त्वचारोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने हेअर रिमूव्हल उपचार करून घ्यावे. त्याचप्रमाणे ‘पीसीओडी’ दरम्यान पुदिन्याचा चहा प्यायल्याने अनावश्यक केस वाढ रोखण्यास मदत होते, असे एका टर्किश निरीक्षणातून समोर आले आहे.

- Advertisement -

आहार, व्यायामाकडे दुर्लक्ष नको – ‘पीसीओडी’ आजारात महिलांनी आपल्या आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ‘पीसीओडी’ दरम्यान वाढत्या वजनावर मात करण्यासाठी दररोज तुमच्या वजनाच्या ५ टक्के वजन घटविण्यापासून सुरुवात करा. आठवड्यातून किमान तीन दिवस आपल्या दैनंदिनीमध्ये ३० मिनिटे मध्यम तीव्रतेच्या व्यायामाचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच या आजारादरम्यान महिलांनी आहाराबाबतही सजग असावे. कमी कर्बोदके असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्याचप्रमाणे ओमेगा ३ युक्त मासे, तुळस, अक्रोड सारखे पदार्थ खावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -