घरमुंबईबेस्टच्या लक्झरी प्रीमियम बसगाड्यांना चांगला प्रतिसाद; दररोज लाखोंचे उत्पन्न

बेस्टच्या लक्झरी प्रीमियम बसगाड्यांना चांगला प्रतिसाद; दररोज लाखोंचे उत्पन्न

Subscribe

मुंबई : कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या लक्झरी प्रीमियम बसगाड्यांना प्रवाशांकडून दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बीकेसी ते वांद्रे, बेलापूर, खारघर, ठाणे अशा बसमार्गांवर या बसगाड्या धावत आहेत. दररोज या बसगाड्यांमधून 3 हजार 600 प्रवासी प्रवास करत असून त्यामुळे बेस्टच्या तिजोरीत दररोज 3.50 लाखांचे उत्पन्नाची भर पडत आहे. या बसगाड्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच पुश बॅक सिट्स, सिट्ससमोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागाही आहे. विशेष म्हणजे या बसगाडीमधून उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे. (BESTs luxury premium coaches well received Daily income of lakhs)

हेही वाचा – ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांत BMCचा उत्स्फूर्त सहभाग

- Advertisement -

वास्तविक, बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग हा कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. हा तोटा कमी करण्यासाठीच बेस्ट उपक्रमाने भाडे तत्वावर काही बसगाड्या घेतल्या आहेत. तसेच, बेस्टने मागील काळात तिकीट दरातही कपात केली आहे. त्यामुळे आता या कंत्राटी एसी मिनी बसगाड्यांमधून अवघ्या 6 रुपयांत प्रवास करणे शक्य झाले आहे. बेस्ट उपक्रम जरी तोट्यात सुरू असला तरी बेस्ट आपल्या प्रवाशांना अधिकाधिक चांगली बससेवा देत आहे. त्यातच बेस्ट उपक्रमाने 12 डिसेंबरपासून लक्झरी प्रीमियम बससेवा सुरू केली आहे.

हेही वाचा – ST बदलतेय : लांब पल्ल्याचा प्रवास होणार आरामदायक; विना वातानुकूलित स्लीपर बसेस लवकरच सेवेत

- Advertisement -

सध्या या बसगाड्या एस 101 – ठाणे ते बीकेसी, एस 102 वांद्रे ते बीकेसी , एस 104 विमानतळ ते कफ परेड, एस 105 – विमानतळ ते खारघर, एस 106 – विमानतळ ते ठाणे, एस 111 – ठाणे ते अंधेरी, एस 112 गुंडवली ते बीकेसी, 114 खारघर ते बीकेसी, एस 115 बेलापूर ते बीकेसी, एस 122 विमानतळ ते गुंदवली, एस 123 विमानतळ ते गुंदवली या बसमार्गांवर सदर बसगाड्या सुरू आहेत.

बेस्टच्या या प्रीमियम लक्झरी बसगाडीने दररोज साडेतीन हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांची पसंती लक्षात घेता भविष्यात आणखी नवीन बस मार्गावर या लक्झरी बसेस चालवण्यात येतील, असे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -