घरमुंबईमुंबई महापालिकेचा कोरोनाच्या लढाईत २५०० कोटींचा खर्च; भाजपची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

मुंबई महापालिकेचा कोरोनाच्या लढाईत २५०० कोटींचा खर्च; भाजपची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने मुंबईमध्ये कोरोनाच्या लढाईत केलेल्या खर्चांची तपशीलवार माहिती देणारी श्वेतपत्रिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढावी, अशी मागणी भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या लढाईत आतापर्यंत २ हजार ५०० कोटींचा खर्च केला असून आता अधिकचा खर्च वाढत असल्यामुळे आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढवी अशी मागणी भाजपची आहे, असं शिरसाट म्हणाले.

मार्च २०२० पासून आज ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाच्या लढाईत खर्च केला. २०२० मध्ये कोरोनावर २१०० कोटी खर्च झाला. त्याचवेळेला ४०० कोटीचा अतिरिक्त निधी स्थलांतरित करण्याची मंजुरी स्थायी समितीने दिली. म्हणजेच २५०० कोटी. त्यानंतर देखील खर्च वाढला आहे, असं भालचंद्र शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

आज पर्यंत किती हजार कोटी खर्च झाला? त्याचा नेमका तपशील आणि हा कशावरती खर्च झाला? याची सविस्तर श्वेतपत्रिका आयुक्तांनी काढावी अशी मागणी भाजपने स्थायी समितीत केलेली आहे. आज स्थायी समितीच्या पटलावर बांद्रा बीकेसी येथील कोविड जम्बो सेंटरमधील खर्चाचे दोन प्रस्ताव होते. एक प्रस्ताव होता ५२ कोटीचा आणि ७७ कोटींचा दुसरा प्रस्ताव होता. पण त्याचा कुठलाही तपशील या प्रस्तावात नव्हता. अशा कार्योत्तर मंजूरीसाठी आलेल्या प्रस्तावांना डोळे मिटून स्थायी समितीने मंजूरी देणे योग्य नाही. कोविडचा सगळा खर्च एकदा सगळ्या जनतेसमोर येणं आवश्यक आहे अशी भाजपची भूमिका आहे, असं भालचंद्र शिरसाट म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -