घरमनोरंजनलहानपणी भाऊ रहायचा 'या' छोट्याशा घरात

लहानपणी भाऊ रहायचा ‘या’ छोट्याशा घरात

Subscribe

इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असलेल्या भाऊ कदम यांनी नुकताच त्यांच्या बालपणीच्या ठिकाणचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

सध्याच्या घडीला मराठीतील विनोदवीरांच्या यादीत भालचंद्र कदम ऊर्फ भाऊ कदम यांचे नाव आघाडीवर घेण्यात येते. अचूक टायमिंग साधत विनोदाने धमाल उडवून देत भाऊ कदम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतात. पण खऱ्या आयुष्यात मात्र भाऊ कदम साध्या राहणीमानाला प्राधान्य देतात. हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या भाऊ कदम यांनी यशाच्या शिखरावरसुद्धा त्यांनी स्वभावातील साधेपणा सोडला नाही. इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असलेल्या भाऊ कदम यांनी नुकताच त्यांच्या बालपणीच्या ठिकाणचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

View this post on Instagram

Majha balpan !

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial) on

- Advertisement -

भाऊ कदम यांना आपल्या बालपणीच्या ठिकाणचा फोटो शेअर करताना त्या फोटोला ‘माझे बालपण’ अशी फोटोओळ दिली आहे. फोटोमध्ये दिसणारी जागा मुंबईतील बीपीटी क्वॉटर्सटची आहे. कोकणी कुटुंबात जन्मलेले भाऊ कदम यांचे वडील बीपीटीत नोकरी करत होते. तर आई गृहिणी होती. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात भाऊ कदम यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

View this post on Instagram

Family?

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial) on

- Advertisement -

वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर घराची जबाबदारी भाऊंच्या खांद्यावर येऊन पडली. त्यावेळी बीपीटीमधील घरसुद्धा त्यांना सोडावे लागले. त्यानंतर ते कुटुंबासह डोंबिवलीत स्थायिक झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला कारकुनाची नोकरी स्विकारली. पण लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने तसेच कठोर मेहनतीच्या जोरावर भाऊंनी मराठी मनोरंजन विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -