घरमुंबईभिवंडीत महिलेची हत्या की आत्महत्या?

भिवंडीत महिलेची हत्या की आत्महत्या?

Subscribe

शहरातील भादवड परिसरात राहणार्‍या 22 वर्षीय विवाहित महिलेची हत्या झाली असून धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी सुरुवातीला तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्या झाल्याची नोंद शांतीनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. सपना राजकुमार गौतम असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. भिवंडी शहरातील भादवड येथील गुळवी चाळीच्या खोलीत चार फेब्रुवारी रोजी मजुरी कामावर गेलेल्या राजकुमार याला त्याच्या घराच्या परिसरात राहणारा रामगणेश याने दुपारी 4 वाजता कामावर येऊन तुझ्या पत्नीची तब्येत बिघडली असल्याची खबर दिली. त्यावेळी त्याच्या पतीने घरी येऊन पहिले असता पत्नी बेशुद्धावस्थेत आढळली.

तिला स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या गळ्यावर एक जखम आढळली. आजारणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची शक्यता तिच्या पतीने व्यक्त केली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांनी या मृतदेहाची पुन्हा तपासणी केली असता उजव्या गालावर खरचटल्याचे निशाण तर डाव्या गालावर थोडी खोल जखम आढळून आली. शवविच्छेदन केले असता सपना गौतम या महिलेचा मृत्यू हा तीक्ष्ण हत्याराने मानेच्या रक्तवाहिन्या तुटल्याने अतिरक्तस्रावामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पतीचा जबाब नोंदवून पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनास्थळावरून एक चाकू व घरात पडलेले रक्ताच्या डागाचे कपडे तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या महिलेची हत्या कोणी व कोणत्या कारणांसाठी केली याचा तपास शांतीनगर पोलीस करीत असून परिसरातून तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -