घरक्रीडामहाराष्ट्राच्या टेबल टेनिस संघात नाशिकचे तेरा खेळाडू

महाराष्ट्राच्या टेबल टेनिस संघात नाशिकचे तेरा खेळाडू

Subscribe

अभय प्रशाल, इंदोर येथे १२ ते १७ फेब्रुवारी २०१९ दरम्यान होणार्या राष्ट्रीय वेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या तेरा खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.

४० वर्षावरील पुरुषांच्या महाराष्ट्र अ संघाच्या संघनायकपदी पंकज रहाणे यांची, तर ब संघाच्या संघनायकपदी दिवेंदू चांदूरकर यांची नेमणूक झाली आहे. ६० वर्षावरील वयोगटात महाराष्ट्राच्या संघात उमेश कुंभोजकर यांची निवड झाली. ६५ वर्षावरील वयोगटात शिवानंद कुंडाजे यांची महाराष्ट्र संघाच्या संघनायकपदी, तर रवींद्र लिमये यांची या संघात निवड झाली आहे. ७० वर्षावरील वयोगटात सतीश शिरसाठ यांची संघनायकपदी नेमण्यात आले आहे.

- Advertisement -

महिलांमध्ये ४० वर्षावरील गटात सुनीता धटींगण यांची संघनायकपदी, तर उज्ज्वला कांबळे यांची या संघात निवड झाली. ५० वर्षावरील गटात वनिता माने यांना संघात स्थान मिळाले आहे. ६० वर्षावरील गटात ज्योती कुलकर्णी, गीता कुमठेकर आणि रोहिणी सहस्रबुद्धे यांची, तसेच ६५ वर्षावरील गटात अंजली कानेटकर यांची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू नाशिक जिमखाना येथे सराव करतात.

पंकज रहाणे व सतीश शिरसाठ राज्य अजिंक्यपद विजेते
नुकत्याच सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटरन्स अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या पंकज रहाणे यांनी ४० वर्षावरील गटात राज्य अजिंक्यपद मिळवून अलौकिक कामगिरी केली. तर ७० वर्षावरील गटात सतीश शिरसाठ यांनी राज्य अजिंक्यपद मिळवले. पंकज रहाणे यांनी अंतिम फेरीत सोलापूरच्या मनीष रावत याचा ३-० असा पराभव करून राज्य अजिंक्यपद पदावर कब्जा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -