घरमुंबईमविआ सरकारने अडीच वर्षात मराठवाडा, विदर्भाशी बेईमानी केली, पण आता... बावनकुळेंकडून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न

मविआ सरकारने अडीच वर्षात मराठवाडा, विदर्भाशी बेईमानी केली, पण आता… बावनकुळेंकडून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न

Subscribe

राज्यात 19 डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. या अधिवेशनापूर्वी विरोधकांना सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. सीमावाद, महापुरुषांचा अपमान, बेरोजगारी, महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प अशा अनेक मुद्द्यावरून विरोधक सभागृहात राडा करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला विविध मुद्द्यावरून घेरणार असल्याचे भाष्य केले. ज्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी टीकात्मक प्रत्युत्तर दिले आहे.

मविआने नागपूर, मराठवाडा, विदर्भाला का मागे ठेवलं?

नागपूर हिवाळी अधिवेशनामागचा उद्देश मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यातील मागासलेल्या भागांचा विकास झाला पाहिजे हा आहे, आणि ही महाराष्ट्राचीही मागणी आहे. अडीच वर्षे सरकार होत तेव्हा नागपूरला अधिवेशन घेतलं नाही. अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही महाराष्ट्रातील नागपूर, मराठवाडा, विदर्भाला का मागे ठेवलं? असा पहिला प्रश्न विरोधकांना नागपूरला येताच विचारणार असल्याचे बावनकुळेंनी म्हटले.

- Advertisement -

मविआ सरकारने विदर्भावर नेहमी अन्याय केला

मविआ सरकारला काय बोलायचा अधिकार आहे. ज्यांनी मराठवाडा, विदर्भाशी नेहमी आकसं केला, 55 वर्षे सरकार चालवून विदर्भ आणि मराठवाड्याचा सत्यानाश केला, त्यांना बोलायचा अधिकार नाही. 3 वर्षांपासून नागपूरमध्ये अधिवेशन घेता येऊ शकलं असते पण नाही घेतलं. विदर्भावर नेहमी अन्याय केला. नागपूरला अधिवेशन आलं की, नेहमी मुंबईला घ्यायचं, नागपूर करार मोडायचा. मराठवाडा, विदर्भाशी बेईमानी त्यांनी केली त्यामुळे त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही, असही बावनकुळेंनी ठणकावून सांगितले आहे.

विदर्भ, मराठवाड्याचे सर्व प्रश्न सुटणार, नागपूरकरांना न्याय मिळणार

या अधिवेशनातून विदर्भ आणि मराठवाड्याचे सर्व प्रश्न सुटणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी तयारी केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या नागपूर कराराचे महाविकास आघाडी सरकारने उल्लंघन केले. पण आता खऱ्या अर्थाने नागपूरकरांना न्याय मिळणार आहे, असा विश्वास देखील बावनकुळेंनी व्यक्त केला.


धक्कादायक! पालघरच्या सातपटीत अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार; आठ आरोपींना अटक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -