घरमहाराष्ट्रपुणेअमित शाह, चंद्रकांत दादांवरील आक्षेपार्ह विधाने भोवली; माजी आमदारावर गुन्हा दाखल

अमित शाह, चंद्रकांत दादांवरील आक्षेपार्ह विधाने भोवली; माजी आमदारावर गुन्हा दाखल

Subscribe

एका महिलेने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात तक्रार केली होती. मी घरात असताना मोबाईलवर व्हिडिओ आला. त्यात जाधव हे केंद्रीय मंत्री शाह व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करत होते, असे महिलेने तक्रारीत नमूद केले होते. त्याची दखल घेत दत्तवाडी पोलिसांनी जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पुणेः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात तक्रार केली होती. मी घरात असताना मोबाईलवर व्हिडिओ आला. त्यात जाधव हे केंद्रीय मंत्री शाह व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करत होते, असे महिलेने तक्रारीत नमूद केले होते. त्याची दखल घेत दत्तवाडी पोलिसांनी जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

जाधव यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसारीत करत केंद्रीय मंत्री शाह व मंत्री पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. त्यांची बदनामी केली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३५४ (अ), ५०९, ५०१, ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

जाधव हे कन्नड तालुका क्षेत्रातून २००९ साली मनसेच्या तिकिटावर निवडून आले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व २०१४ साली निवडून आले. मात्र २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. ते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

- Advertisement -

त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.

रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी माझ्याविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घेतला. त्यामुळेच मी अंतूर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो”, असे गंभीर आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केले होते. रावसाहेब दानवे यांची कन्या संजना हीचा हर्षवर्धन जाधव यांच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक आपत्य आहे. गुन्हा दाखल झाल्याने जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस त्यांच्या विधानांची चौकशी करून पुढील कारवाई करतील.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -