घरमुंबईBJP म्हणजे 'बेरोजगारी जमाव पार्टी'

BJP म्हणजे ‘बेरोजगारी जमाव पार्टी’

Subscribe

काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक संघवी यांच टीका

मोदी सरकार सध्या विकासाच्या मुद्यांवर प्रचार न करता भावनिक मुद्यांवर भर देत आहे. आज देशात अनेक प्रश्न आहेत. कृषी, आर्थिक व्यवस्था आणि बेरोजगारीसारखा प्रश्न असताना भाजप इतर मुद्यांवर भर देत आहे, बेरोजगारीचेच उदाहरण द्यायचे झाले तर नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. देशाची अर्थव्यवस्था संपूर्णतः कोलमडलेली आहे. बीजेपी म्हणजे बेरोजगार जमाव पार्टी झालेली आहे, असे जोरदार टीकास्त्र गुरुवारी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक संघवी यांनी मुंबईत केली. ही टीका करताना काँग्रेसच्या घोषणापत्रांची आठवण करुन देताना २२ लाख सरकारी नोकर्‍यांची रिक्तपदे भरणार असल्याचे यावेळी पुन्हा एकदा जाहीर केले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एआयसीसी सचिव आशिष दुआ, काँग्रेसचे माजी आमदार चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस आनंद शुक्ला उपस्थित होते. आज देशाची अर्थव्यवस्था संपूर्णतः कोलमडलेली आहे. एनएसएसओचा अहवाल लक्षात घेता गेल्या ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी ६.१ टक्के भाजप सरकारच्या काळात झाली, काँग्रेसच्या काळात २०११-१२ मध्ये २.२ टक्के होती. शहरीभागामध्ये वयोगट १५ ते २९चे पुरुष २०११-१२ मध्ये ८.१ टक्के बेरोजगार होते आणि २०१७-१८ मध्ये त्यांची संख्या वाढून १८.७ टक्के झालेली आहे. हीच परिस्थिती महिलांची झालेली आहे. २०११-१२ मध्ये १३.१ टक्के होती आणि तीच संख्या वाढून २७.२ टक्के झालेली आहे.

- Advertisement -

एनएसएओ अहवाल 2017 – 18 नुसार ४.७ लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. ३ करोड नोकर्‍या कृषी कामगारांच्या गेलेल्या असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर २०१८ मध्ये १.१ करोड नोकर्‍या गेलेल्या आहेत आणि ८८ लाख महिलांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ मध्ये बेरोजगारीचा दर पदवीधर आणि पद्व्युत्तर पदवीधरांचा १३.२ टक्के एवढा झालेला आहे आणि दहावी ते बारावी शिक्षण झालेल्यांचा १०.६ टक्के एवढा झालेला आहे तसेच अझीम प्रेमजी युनिवर्सिंटी नुसार देशातील ५० लाख लोकांच्या नोकर्‍या २०१६ ते २०१८ या गेलेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयामुळे आणि जीएसटीमुळे भारताची अर्थव्यवस्था संपूर्णतः कोलमडलेली आहे. अर्थव्यवस्थेत वाढ झालेली नाही, जीडीपी घसरलेला आहे. विदेशी गुंतवणुकीत वाढ झालेली नाही, नवीन गुंतवणूक झालेली नाही. कृषी उद्योगात वाढ नाही, औद्योगिक वाढ नाही, रुपया घसरलेला आहे. व्यापार आणि उद्योग धंदे बुडाले आहेत. शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. सर्वच क्षेत्रात आपण मागे पडलेलो आहोत. सर्व नामांकित संस्थांचे हेच रिपोर्ट आणि आकडे आहेत, त्यामुळेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा जनतेसमोर कोणतेच प्रगतीचे आकडे सादर करू शकत नाही. विकासाच्या गोष्टी बोलू शकत नाही आहे, असेही संघवी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -