घरमुंबईनाना पटोले हे 'मिस्टर नटवरलाल'च्या भूमिकेत; बावनकुळेंची टीका

नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’च्या भूमिकेत; बावनकुळेंची टीका

Subscribe

पटोलेंविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खोटे बोलण्याचा काम करतात, नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल बोलून गावातील गाव गुंडा बद्दल बोलल्याचं सांगत ते खोटं बोलत आहे. एवढेच नाही तर ते काँग्रेसची प्रतिमा घालवण्याचा काम करत आहेत. अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

‘पटोलेंविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार’

एवढेच नाही तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा यांच्यामुळे जाण्याची वेळ आली आहे. मी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं तिथे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, पण ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं तिथे चारशे लोकांची गरज होती आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही मी याविरोधात कोर्टात जाऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे, गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

- Advertisement -

‘महात्मा गांधींवर प्रेम असेल तर पटोलेंनी सत्तेतून बाहेर पडून दाखवा’

काँग्रेसचे खासदार कोल्हे यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी म्हटले, ते कलाकार म्हणून काम करताय, दुसरीकडे नाना पटोले म्हणतात आम्ही सिनेमा चालू देणार त्यामुळे हा राजकीय सिनेमा बंद करा, पटोले यांना महात्मा गांधींवर प्रेम असेल तर सत्तेतून बाहेर पडा असे आव्हान बावनकुळेंनी दिले आहे.

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अश्लील नृत्याचे प्रकार उघडकीस येत आहे, या अवैध धंद्यांना ऊत आला आहे, बेकायदेशीररित्या सुरु असलेले धंदे सट्टापट्टी पालकमंत्र्यांचा याकडे लक्ष नाही, पोलिसांनाही सगळ्या धंद्याची माहिती पोलिसांना असून हफ्ते वसुली सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच शहराबाहेर फार्म हाऊसवर असे धंदे सुरू असल्याचेही ते म्हणाले आहेत.


रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा; वर्षा गायकवाडांचे आदेश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -