घरताज्या घडामोडीपालघर जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

Subscribe

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेने १८ आणि राष्ट्र।वादी काँग्रेसने १५ जागा जिंकत भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला आहे. सत्ताधारी भाजपला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले. तर बहुजन विकास आघाडीला देखील मोठा फटका बसला. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल शिवसेनेला १४ जागा मिळाल्या होत्या. तर बहुजन विकास आघाडीकडे १० जागा होत्या. यावेळी मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यानंतर भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, राज्यात असलेले महाविकासआघाडीचे गणित या ठिकाणी जुळले न गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि बहुजन विकास आघाडीची युती झाली होती. पण काँग्रेस स्वतंत्रपणे लढत होती.

भाजपची मोठी पीछेहाट

जिल्हा परिषदेच्या निवडणुक निकालाने भाजपला मोठा दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या भाजपला जिल्हा परिषदेतही स्थानिक मतदारांनी नाकारले आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तब्बल २१ जागा जिंकलेल्या भाजपला यावेळी फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर गेल्या वेळेपेक्षा ४ जागा जास्ती जिंकत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत. अवघ्या ५ जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात १५ जागा आल्या आहेत. ५ जागा असलेल्या माकपनेही यावेळी वाढ करत ६ जागा जिंकल्या आहेत. तर बहुजन विकास आघाडीचा आकडा १० वरून ४ वर आला आहे. काँग्रेसने १ जागा जिंकत आपले खाते उघडले आहे. याशिवाय ३ जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. मात्र, एकंदरीत आकडेवारी पाहिल्यास, पालघर जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्याची स्थिती आहे.

- Advertisement -

जिंकलेल्या जागा मागील जागा

शिवसेना
२०२० – १८
२०१५ – १४

राष्ट्रवादी काँग्रेस
२०२० – १५
२०१५ – ०५

- Advertisement -

भाजप
२०२० – १०
२०१५ – २१

माकप
२०२० – ०६
२०१५ – ०५

बविआ
२०२० – ०४
२०१५ – १०

काँग्रेस
२०२० – ०१
२०१५ – ०१

अपक्ष
२०२० – ०३
२०१५ – ०१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -