घरमुंबईबाल - माता मृत्यूच्या संख्येवर विशेष लक्ष द्या - अमित देशमुख

बाल – माता मृत्यूच्या संख्येवर विशेष लक्ष द्या – अमित देशमुख

Subscribe

प्रसुतीदरम्यान होणाऱ्या गर्भवती महिलांचा मृत्यू तसेच नवजात बालकांच्या मृत्यू घटनांकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अशी सुचना नवनिर्वाचित वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.

प्रसुतीदरम्यान होणाऱ्या गर्भवती महिलांचा मृत्यू तसेच नवजात बालकांच्या मृत्यू घटनांकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अशी सुचना नवनिर्वाचित वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या मुंबईतील जे. जे हॉस्पिटलला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या आरोग्य समस्यांची विशेषत्वाने काळजी घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.

अमित देशमुख यांनी नुकताच वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षणाची सद्यस्थिती आणि हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि हॉस्पिटलच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्ये विभाग सचिव डॉ. संजय मुखर्जी यावेळी देशमुख यांच्यासोबत होते. यावेळी रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत देशमुख यांनी सुचना दिल्या.

- Advertisement -

जे. जे हॉस्पिटलच्या १७५ वर्षातील कारकीर्द

वैद्यकीय शिक्षणातील संशोधनात देखील महाराष्ट्र अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी इच्छा देशमुख यांनी व्यक्त केली. त्याचवेळी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि हॉस्पिटल, तेथील रुग्णाची संख्या आणि सुविधा, कर्मचाऱ्यांची माहिती अशी वैद्यकीय हॉस्पिटलशी निगडीत विषयाची माहिती डॉ. मुखर्जी देशमुख यांना दिली. तर, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी जे. जे हॉस्पिटलच्या १७५ वर्षातील कारकीर्द मांडली. यावेळी डीएमइआर संचालक डॉ. तात्याराव लहाने देखील उपस्थित होते.


हेही वाचा – बंदमध्ये सरकारी हॉस्पिटलचे तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -