घरताज्या घडामोडीकोणी गाय मारली म्हणून वासरू मारणारी मी नाही - मनिषा चौधरी

कोणी गाय मारली म्हणून वासरू मारणारी मी नाही – मनिषा चौधरी

Subscribe

लसीकरण केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी सेना - भाजप लोकप्रतिनिधी एकाच मंचावर

सर्व राजकीय परिस्थितीत आज बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या परिसरात पालिकेच्या लसीकरण केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी शिवसेना व भाजप यांचे आमदार, नगरसेवक हे एकच एकत्रित आले होते. या लसीकरण केंद्राचे उदघाटन पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.याप्रसंगी, महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना आमदार विलास पोतनीस, नगरसेविका शीतल म्हात्रे आणि भाजपतर्फे स्थानिक आमदार मनीषा चौधरी, स्थानिक नगरसेवक प्रवीण शहा, जितेंद्र पटेल, अंजली खेडकर, जगदीश ओझा, बिना दोशी, हरीश छेडा आदी एकाच ठिकाणी उपस्थित झाले होते. याबाबत, भाजपच्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता, लसीकरण केंद्र हे भाजपचे स्थानिक नगरसेवक प्रवीण शहा यांच्या विभागात आणि माझ्या विधानसभा मतदारसंघात येत असले तरी त्यांनी (शिवसेनेने) महापौरांना बोलावल्याने आम्ही मोठया दिलाने आणि मोठया मनाने मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांचे स्वागतच केले. कोणी गाय मारली म्हणून वासरू मारणारी मी नाही, असे वक्तव्य आमदार मनीषा चौधरी यांनी केले. (BJP MLA manisha chaudhari Slam Shiv sena)

याप्रसंगी, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.सत्तासंघर्षातून शिवसेना – भाजप या अगोदरच्या मित्रपक्षात मुंबईत, राज्यात आणि केंद्रातही टोकाचे मतभेद झाले आहेत. शिवसेनेने राज्यात महाविकास आघाडी स्थापून तर मुंबई महापालिकेत अपक्षांची मोट बांधून सत्ता काबीज केली. सर्वात जास्त जागा मिळवूनही राज्यातील सत्ता हातातून गेल्याने भाजप जखमी शेर झाला आहे. या पाहायला मिळाले. सुदैवाने या ठिकाणी श्रेयवादातून काही वाद झाला नाही.
याप्रसंगी कोणताही वाद झाला नाही. कार्यक्रम शांततेत पार पडला, असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार यांच्या घराबाहेरील आंदोलन मागे, लवकरच तोडगा काढण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -