घरताज्या घडामोडीविनामास्क नागरिकांकडून ७७ कोटींची दंड वसुली

विनामास्क नागरिकांकडून ७७ कोटींची दंड वसुली

Subscribe

गेल्या दीड वर्षात विनामास्क ३७ लाख नागरिकांवर दंडात्मक कारवाई

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिकेने कोरोना नियम लागू केले. मात्र तरीही कोरोना नियमांचे पालन न करता उलट उल्लंघन करणाऱ्या ३७ लाख नागरिकांकडून गेल्या दीड वर्षात तब्बल ७७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत तेवढीच भर पडली आहे. या दंडात्मक रकमेपैकी ५०% रक्कम क्लिनअप मार्शल संस्थेला देण्यात येते तर उर्वरित ५०% रक्कम कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरली जात असल्याचे सांगण्यात येते.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून पालिका प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक केले. कोरोनाची पहिली लाट जानेवारी २०२१ पर्यंत नियंत्रणात आली. तर दुसरी लाट फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली ; मात्र ह्या दुसऱ्या लाटेवरसुद्धा नियंत्रण मिळविण्यात पालिकेला काहीसे यश आले. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त करण्यात येत असली तरी पालिकेनेही जय्यत तयारी केली आहे. मात्र कोरोनावर जरी नियंत्रण आलेले असले तरी कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात क्लिनअप मार्शलांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येते.

- Advertisement -

मुंबईमध्ये गेले दीड वर्षात विनामास्क ३७ लाख २३ हजार १९ नागरिकांवर रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने आतापर्यंत या नागरिकांकडून ७७ कोटी ३७ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

यामध्ये, पालिकेने ३० लाख ६३ हजार ८८१ नागरिकांवर कारवाई करत ६४ कोटी १६ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर मुंबई पोलिसांनी ६ लाख ३५ हजार २४७ नागरिकांवर कारवाई करत १२ कोटी ७० लाख ४९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच, रेल्वे प्रशासनानेही रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कंत्राटदार एक, दोन रुग्णालयात कपडे धुण्याचे दर वेगवेगळे, पालिकेला १० लाखांचा फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -