घरमहाराष्ट्रवानखेडेंवर झालेल्या आरोप प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा; दिलीप वळसे- पाटील यांची माहिती

वानखेडेंवर झालेल्या आरोप प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा; दिलीप वळसे- पाटील यांची माहिती

Subscribe

क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या कारवाईत पंच असलेल्या प्रभाकर साईलने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी दिली.

याआधी केंद्रीय यंत्रणांचा अधिकचा वापर झाला नव्हता. मात्र अलीकडे सरकार आणि राजकीय नेत्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे, असेही वळसे- पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

वळसे पाटील यांनी आज वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप करणाऱ्या साईल यांना त्यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे सांगितले. तसेच याविषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस तक्रार दाखल होणे आवश्यक आहे. तशी तक्रार दाखल झाली तर पोलीस नक्कीच एफआयआर दाखल करून पुढील कारवाई करतील, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -