घरमुंबईBMC : थकबाकीदारांची नावे जाहीर होताच मालमत्ता कर भरण्‍यासाठी मागितली मुदत

BMC : थकबाकीदारांची नावे जाहीर होताच मालमत्ता कर भरण्‍यासाठी मागितली मुदत

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेने ‘मालमत्ता कर’ थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. करनिर्धारण आणि संकलन खात्याचे पथक भेटीला येताच करदाते धनादेश (चेक), धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सोपवित आहेत. तर, काही थकबाकीदारांनी 31 मार्चपर्यंतची मुदत मागितली आहे. त्यामुळे या घडामोडी पाहता 31 मार्चपर्यंत पालिकेच्या तिजोरीत सर्व थकबाकीदारांकडून देत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. पालिकेला वर्षभरातील मालमत्ता करापोटी 4,500 कोटी रुपयांचे टार्गेट गाठणे शक्य होणार असे दिसते. दरम्‍यान, नागरिकांनी वेळेत कर भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (BMC Deadline sought for payment of property tax as soon as names of defaulters are announced)

हेही वाचा – Ravindra Dhangekar : वसंत मोरे पुण्यातून मविआचे उमेदवार? धंगेकर म्हणतात, मी माघार घ्यायला तयार

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची थकबाकी रक्कम आणि कंपनीची नावे गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्याच्या बातम्या दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रात झळकल्या. त्यामुळे  थकबाकीदारांची दाणादाण उडाली. काही तासातच थकबाकीदारांनी आर्थिक वर्षाचा कर आणि थकीत कर भरणा करावा यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने जोरदार पाठपुरावा सुरू केला. थकबाकी व चालू आर्थिक वर्षाचा कर वसुलीसाठी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. करदात्यांना कर भरणा करण्याचे आवाहन मायकिंगद्वारे, दर्शनीय ठळक बॅनरद्वारे तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून 31 मार्च 2024 पर्यंत करभरणा करणेबाबत प्रोत्साहित करण्यात आले आहे.

पालिकेवर आली सारवासारव करण्याची वेळ

मुंबई महापालिकेने ज्या टॉप टेन थकबाकीदारांची नावे जाहीर केली, त्यापैकी काहींनी पालिकेकडे जाब विचारत कान उघाडणी केली. त्यामुळे पालिकेवर काही तासातच त्यांची बाजू सावरण्याची वेळ आली. मेसर्स भारत डायमंड फोर्स आणि गोदरेज ग्रीन होम्स लिमिटेड यांनी 25 मार्च 2024 रोजी नियमित कर भरणा करण्याचे आश्वासित केले आहे. ते थकबाकीदार नसून प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये वेळेत कर भरणा करतात. त्यांचा चालू आर्थिक वर्षाचा कर 31 मार्च 2024 पूर्वी भरून महापालिकेला सहकार्य करणार आहेत, अशी सारवासारव पालिकेकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thane : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींचा गदारोळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

टॉपटेन मालमत्ता करधारकांनी आश्वासित केलेली यादी

1) न्यू दाऊद बाग 18 कोटी 15 लाख 33 हजार 843 रुपये
2) मेसर्स फिनिक्स मॉल 17 कोटी 60 लाख 78 हजार 592 रुपये
3) न्यू दाऊद बाग 10 कोटी 99 लाख 32 हजार 659 रुपये
4) एच. एम. मॉल, श्री ग्रुप 10 कोटी 61 लाख 7 हजार 308 रुपये
5) वोक्हार्ड रूग्णालय 8 कोटी 47 हजार 185 रुपये
6) सुप्रिम बिझनेस पार्क 8 कोटी 8 लाख 62 हजार 316 रुपये
7) आयओरी प्रॉपर्टीज इन ऑरर्बीट मॉल 7 कोटी 72 लाख 35 हजार 370 रुपये
8) एक्सप्रेस झोन 2 कोटी 70 लाख 25 हजार 328 रुपये
9) आनंद राज इंडस्ट्रीयल 2 कोटी 58 लाख 88 हजार 819 रुपये
10) हॉटेल लिला व्हेन्टायर 2 कोटी 27 लाख 67 हजार 387 रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -