घरमुंबईBMC : मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेचा तगादा; काहींना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा

BMC : मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेचा तगादा; काहींना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा

Subscribe

मुंबई : आर्थिक वर्ष संपत आले, मात्र तरीही पालिकेला अपेक्षित कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर वसुली करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे आता पालिकेने आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मालमत्ता करधारकांकडे सतत पाठपुरावा करणे आणि आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ता धारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्यासाठी मुभा देणे सुरू केले आहे. (BMC Municipal Corporation for Collection of Property Tax Some are allowed to pay tax in stages)

हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेला लाभणार नवे आयुक्त? निवडणूक आयोगाने नावे  मागवली

- Advertisement -

मुंबई महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात साडेचार हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुली करण्याचे टार्गेट ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत 1200 कोटींपर्यंत वसुली झाली आहे. त्यामुळे उर्वरित मालमत्ता कर वसुली आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. त्यासाठीच पालिकेकडून सतत पाठपुरावा सुरू आहे. मालमत्ताकर वसुलीच्या अंतिम टप्प्यात मुंबई महापालिकेच्‍या करनिर्धारण व संकलन खात्‍याने, ज्यांची आर्थिक क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ता धारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा दिली आहे.

महापालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून मालमत्ता कर संकलन विभागाकडे पाहिले जाते. त्यामुळे या विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. कर संकलन व कर आकारणी विभागाच्यावतीने कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना आखल्या आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Abhishek Ghosalkar Murder Case : पोलिसांवर दबाव, तपास सीबीआयकडे द्या; घोसाळकर कुटुबियांची मागणी

मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष 2023-24 ची कर देयके फेब्रुवारी 2024 अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे कामकाज सुरू आहे. समाज माध्यमांद्वारे संपर्क करून तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज कार्यरत आहे. करदात्यांना करभरणा करण्याचे आवाहन मायकिंगद्वारे, दर्शनीय ठळक बॅनरद्वारे तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत करभरणा करणेबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे. जनजागृती, वारंवार आवाहन, मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

‘टॉप टेन’ मालमत्ता करधारकांची यादी

  1. गजरिया इलेक्ट्रिक – 38 कोटी 87 लाख 53 हजार 557 रुपये
  2. अर्नेस्‍ट जॉन – 30 कोटी 72 लाख 11 हजार 828 रुपये
  3. लैक अहमद रफिक शेख – 2 कोटी 32 लाख 75 हजार 455 रुपये
  4. सहाजू सहकारी गृहनिर्माण संस्‍था – 2 कोटी 28 लाख 46 हजार 649 रुपये
  5. शिवतापी सहकारी गृहनिर्माण संस्‍था – 1 कोटी 65 लाख 1 हजार 495 रुपये
  6. उज्‍ज्‍वल सहकारी गृहनिर्माण संस्‍था – 1 कोटी 21 लाख 25 हजार 801 रुपये
  7. श्री. व्हि. डी. शहा- 95 लाख रूपये
  8. ओबेरॉय सहकारी गृहनिर्माण संस्‍था – 76 लाख 75 हजार 930 रुपये
  9. मेसर्स नथानी स्‍टील प्रायव्‍हेट लिमिटेड – 70 लाख 94 हजार 501 रुपये
  10. हिंदुस्‍थान डॉर ऑलिव्‍हर लिमिटेड – 64 लाख 15 हजार 415 रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -