घरमुंबईTejaswini Ghosalkar : मलाही त्याच कार्यक्रमाला बोलवण्यात आलं होतं; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा...

Tejaswini Ghosalkar : मलाही त्याच कार्यक्रमाला बोलवण्यात आलं होतं; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा दावा

Subscribe

मुंबई : अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या प्रकरणाशी संबंधित माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी आणि वडील विनोद घोसाळकर यांनी सीबीआयकडून तपास करण्याची मागणी करतानाच सत्ताधारी पक्षावर आरोप केले. तसेच अभिषेकला त्या दिवशी ज्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं, त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवण्यात आलं होतं, असा दावा तेजस्विनी घोसाळकर यांनी यावेळी केला. (Tejaswini Ghosalkar I was also invited to the same event Abhishek Ghosalkar wifes claim)

हेही वाचा – Abhishek Ghosalkar Murder Case : पोलिसांवर दबाव, तपास सीबीआयकडे द्या; घोसाळकर कुटुबियांची मागणी

- Advertisement -

पत्रकार परिषदेत तेजस्विनी घोसाळकर म्हणाल्या की, 8 फेब्रुवारीला माझ्या पतीची हत्या करण्यात आली. त्या हत्येची वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे. माझ्या पतीच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारीख यांचा वावर याबाबत आयुक्तांना तपास करण्यासाठी सांगितलं होतं. 5 मार्च रोजी न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले ते महत्त्वाचे आहे. मॉरिस आणि मिश्रा या दोघांना सोबत गोळ्या खरेदी केल्या. ती गन मिश्राची होती आणि मोरीसला ती वापरण्याची परवानगी होती, असा आरोप तेजस्विनी घोसाळकर यांनी केला.

आम्ही जमा केलेल्या गोष्टी आणि इतर पुरावे पोलिसांकडे देऊन तपासाची मागणी केली होती. सीसीटीव्ही फुटेज देऊन अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली होती. मॉरिसला अमरेंद्र मिश्राने बंदूक दिल्याचे स्पष्ट आहे. दोघांनी मिळून गोळ्या खरेदी केल्या होत्या. अभिषेक आणि मॉरिस यांच्यात असणारे वाद मिश्राला माहिती होते. त्या दिवशी अभिषेकला ज्या कार्यक्रमाला बोलावलं होतं, त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवण्यात आलं होतं, असा दावा करतानाच तेजस्विनी घोसाळकर म्हणाल्या की, माझ्या दोन मुलांचे भविष्य, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. उच्च न्यायालयाला एवढीच विनंती आहे की, त्यांनी लवकर याचा निकाल लावावा, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : जागावाटपाबाबबत महायुतीत रस्सीखेच, त्यामुळे…; काँग्रेसच्या पाठिंब्यावर आंबेडकर स्पष्टच बोलले

सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यावर विनोद घोसाळकर यांच्याकडून संताप

अभिषेकच्या हत्येनंतर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विनोद घोसाळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अभिषेकची हत्या झाली, तेव्हा विरोधीपक्षांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ही मागणी राजकीय असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मुलाबाबत जे वक्तव्य केले ते दु:ख देणारे होते. गाडीखाली श्वान आले तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनीदेखील घोसाळकर यांची हत्या ही ठाकरे गटातील अंतर्गत वादातून झाल्याचे  विधान केले होते. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या प्रकरणावर विधान केले होते, असे सांगतानाच गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात नसताना त्यांची वक्तव्ये बेजबाबदरपणाची आहेत, अशा भावना घोसाळकर यांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -