घरमुंबईBMC News : मुंबईत सामुदायिक शौचालयांच्या बांधकामास सुरुवात; मुदतीत काम करणे बंधनकारक

BMC News : मुंबईत सामुदायिक शौचालयांच्या बांधकामास सुरुवात; मुदतीत काम करणे बंधनकारक

Subscribe

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशानुसार, मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सामुदायिक शौचालय बांधण्याच्या कामाची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. शिंदे यांनी सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश दिले.

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे ‘लॉट-12’ अंतर्गत मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये 77 ठिकाणी सामुदायिक शौचालये बांधकामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. तर 72 ठिकाणी शौचालय बांधकामांचे आराखडे मंजूर झाले आहेत. पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांनी दिलेल्या मुदतीत सामुदायिक शौचालयांचे काम पूर्ण न केल्यास त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. (BMC News Construction of Community Toilets Begins in Mumbai Compulsory to work within the deadline)

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशानुसार, मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील सामुदायिक शौचालय बांधण्याच्या कामाची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. शिंदे यांनी सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश दिले.

- Advertisement -

हेही वाचा : Suraj Chavan On Awhad : दादांवर टीका करताना कुठला माल घेतला होता; सूरज चव्हाणांचा थेट सवाल

शहर विभागामध्ये सामुदायिक शौचालय बांधकामाचे 18 नकाशे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने 8 आराखडे मंजूर केले आहेत. पूर्व उपनगर विभागामध्ये सल्लागारांनी 94 नकाशे सादर केले, त्यापैकी 40 नकाशांची छाननी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने केली. 30 आराखडे मंजूर करण्यात आले आहेत तर एकूण 40 ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Farmers Protest: पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा; चौथ्या दिवशीची चर्चाही निष्फळ

पश्चिम उपनगर विभागामध्ये सल्लागारांनी 95 नकाशे मंजुरीसाठी सादर केले. त्यापैकी 49 नकाशांची छाननी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने केली. 34 शौचालयांचे आराखडे मंजूर करण्यात आले असून, 17 ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांच्या कामांच्या प्रगतीबाबत असमाधान व्यक्त करत कंत्राटदारांच्या कामाचा प्रगतीनिहाय आढावा घ्यावा व कामाचे मूल्यमापन करुन 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी संबंधितांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -