घरमुंबईCostal Road : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबले!

Costal Road : कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबले!

Subscribe

मुंबईत वाढती लोकसंख्या व वाढती वाहन संख्या पाहता मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचे काम हाती घेतले. त्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन व लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना दोन टप्प्यात कामे विभागून देण्यात आली.

मुंबई : मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या तब्बल 14 हजार कोटी रुपये प्रकल्प खर्च असलेल्या कोस्टल रोडचे काम हे आता अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील व मुंबईतील पहिल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार होते. तर संपूर्ण काम मे महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर त्याचे पूर्णपणे लोकार्पण करण्याचे नियोजन होते; मात्र काही कारणास्तव लोकार्पण करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. (Coastal Road The inauguration of the first phase of Coastal Road has been delayed)

मुंबईत वाढती लोकसंख्या व वाढती वाहन संख्या पाहता मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचे काम हाती घेतले. त्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन व लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांना दोन टप्प्यात कामे विभागून देण्यात आली. या कोस्टल रोड च्या कंत्राट कामाची मूळ किंमत 12 हजार 721 कोटी रुपये होती. मात्र कामात काही बदल झाल्याने काम वाढले, खर्च वाढला आणि कामाची मुदतही वाढली. त्यामुळे प्रकल्प खर्च थेट 14 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र या कोस्टल रोडच्या कामामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व जलद होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Farmers Protest: पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा; चौथ्या दिवशीची चर्चाही निष्फळ

तसेच, वेळेत आणि इंधनातही बचत होणार आहे. त्याचप्रमाणे वाहन पार्किंग, मनोरंजन, सायकल ट्रॅक, जॉगिंग यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. सध्या या कोस्टल रोडचे 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारी रोजी सादर करताना कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे सूतोवाच केले होते. आता पालिका सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार हे 19 फेब्रुवारी रोजी होणारे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Nilesh Rane : बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी…; नीलेश राणेंनी सांगितली ‘ती’ आठवण

पहिल्या टप्प्यातील वरळी ते मरीन ड्राइव्ह सुरू होणार

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, आता हे लोकार्पण होणे काहीसे लांबले आहे. मात्र, पहल्या टप्प्यात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे वरळी येथून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी 8 ते रात्री 8 असा बारा तास सुरू राहणार आहे. मात्र, उर्वरित कोस्टल रोडचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच, या कोस्टल रोडला वरळी आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे कामही करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -