घरठाणेठाण्याच्या गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शनाला शानदार सुरूवात

ठाण्याच्या गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शनाला शानदार सुरूवात

Subscribe

ठाणे । मुंबई महानगर क्षेत्रात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या ठाणे शहरातील उत्तमोत्तम प्रकल्पातील नागरिकांच्या बजेटनुसार घरांचा समावेश असलेल्या गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात नागरिकांच्या पसंतीच्या स्वस्त घरांपासून प्रशस्त घरांपर्यंत आणि शहराच्या मध्यवर्ती वस्तीपासून निसर्गरम्य परिसरातील घरांचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार, यंदाच्या प्रदर्शनाला सुमारे २० हजारांहून अधिक नागरिक घरखरेदीसाठी भेट देतील, अशी अपेक्षा क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. ठाणे शहर हे समृद्ध व सांस्कृतिक शहर असून, निसर्गसौदर्याबरोबरच सुरक्षित वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या शहरातील नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध असून, शहराचा परिपूर्ण विकास झाला आहे. या शहराची जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख होत आहे, याकडे क्रेडाई एमसीएचआय, ठाणे चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी लक्ष वेधले. गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांसाठी उत्तम प्रकल्प मिळतील. या प्रकल्पांमध्ये सहभागी झालेल्या रिअल इस्टेट डेव्हलोपर्सकडून सुरक्षित व उत्कृष्ट सुविधा असलेले प्रकल्प सादर करण्यात आले आहेत, असे मेहता यांनी सांगितले.

ठाणे पश्चिम येथील रेमंड मैदानावर गृह उत्सव: प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनाला आजपासून सुरूवात झाली. येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ पासून रात्री ८ पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाण्यात घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न साकार होईल, असे क्रेडाई एमसीएचआय, ठाणेच्या प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले ते पुढे म्हणाले, क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांचे पदाधिकारी व सदस्यांच्या मेहनतीने २१ वे प्रदर्शन साकारण्यात आले आहे. या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण व ग्राहकांच्या पसंतीच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ हा घर घेणाऱ्या इच्छूकांसाठी विश्वासार्ह व सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे, असे प्रतिपादन क्रेडाई एमसीएचआय, ठाणेचे माजी अध्यक्ष अजय आशर यांनी केले. “गेल्या काही वर्षांपासून, क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ठाणे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास केला. त्याची प्रचिती नागरिकांना प्रदर्शनातील उत्तमोत्तम प्रकल्प पाहताना येईल.घर खरेदीसाठी इच्छूक नागरिकांसाठी प्रदर्शन हा उत्तम व विश्वासार्ह पर्याय आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले कि, “रिअल इस्टेट श्रेत्राबरोबरच नागरिकांच्या गरजेच्या दृष्टीकोनातून ठाणे शहर विकसित झाले आहे. ठाणे शहरातील नागरिकांना उत्तम राहणीमानाच्या दृष्टीने विविध सुविधा मिळत आहेत. यापुढील काळातही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प येत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील नागरिकांना फायदा होईल.

- Advertisement -

आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, ठाणे शहराला राहण्याचे शहर म्हणून नागरिकांची वेगाने पसंती मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शहरात विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतीच ठाण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे आणि यामुळे मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कौतुक केले. तसेच या प्रदर्शनातून आतापर्यंत हजारो कुटुंबांना स्वप्नातील घर मिळविण्यास मदत झाली असल्याचे नमूद केले. गेल्या काही वर्षांत घरखरेदीचा ट्रेंड बदलत आहे. नव्या पिढीच्या गरजांनुसार घरांना मागणी वाढत आहे. त्यानुसार ठाणे रिअल इस्टेट क्षेत्रात क्रेडाई एमसीएचआय, ठाणे यांच्या सदस्यांनी विविध प्रकल्प साकारले आहेत. या सदस्यांकडून गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ मध्ये आधुनिक पद्धतीची घरे सादर करण्यात आली आहेत. या घरांच्या खरेदीसाठी प्रत्येक इच्छूक खरेदीदाराने प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -