घरमुंबईमुंबईतील धोकादायक शौचालयाची दुरूस्ती

मुंबईतील धोकादायक शौचालयाची दुरूस्ती

Subscribe

मुंबईतील पुलानंतर आता धोकादायक शौचालयांची दुरूस्ती करण्याचे महापालिकेला काम हाती घेतले आहे.

मुंबईतील पुलानंतर आता शौचालयाच्या दुरूस्तीचा प्रश्न समोर आले आहे. झोपडपट्टी भागात एकादा शौचालय बांधले की, त्याच्या देखभाल, दुरूस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. मात्र, शौचालय बांधून त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलेल्यानी आता ती शौचालये धोकादायक बनत चालली आहेत. महापालिकेला यासंबंधीत आता जाग आली आहे. पालिकेने केलेल्या स्ट्रक्टचरल ऑडिटमध्ये अतिधोकादायक (सी-१) वर्गवारीत समाविष्ट करण्यात आलेली शौचालये लवकरच पाडली जाणार आहेत. तर त्या जागी नवीव आरेखनांनुसार शौचालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी केले सर्वेक्षण

मागील दोन वर्षात शौचालय कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच त्या दुर्घटनेमध्ये तीन व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत. २०१८ जुलै महिन्यात केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९३४ शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणामध्ये ४२३ शौचालय हे धोकादायक असल्याचे आढळून आले होते. तर ही शौचालय पाडून तिथे नवे बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisement -

अधिदान अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये

आर्थिक वर्षात झालेल्या कामांपोटी देय असलेल्या रकमांची पूर्तता ३१ मार्चपूर्वी केली जाते. यानुसार संगणकीय पद्धतीने पूर्तता करताना कंत्राटदाराने जेवढे काम केले असेल किंवा कामाचे जेवढे टप्पे पूर्ण केले असतील, तेवढ्याच रकमेची पूर्तता केली जाणार आहे. तसेच त्या आर्थिक वर्षात केले जाणारे कामाचे अधिदान अर्थसंकल्पीय तरतूदींमधून केले जावे, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत.

शौचालयाचे सर्वेक्षण

  • जुलै महिन्यात ९३४ सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण
  • ४२३ शौचालये धोकादायक म्हणून जाहीर
  • गेल्या २० वर्षांत १४ हजार ३६९ शौचालय बांधली
  • पालिकेचा सन २०२१पर्यंत मुंबईत २२ हजार ७७४ शौचालये बांधण्याचा निर्णय
  • म्हाडाने आतापर्यंत ८० हजार शौचालये बांधून देखभालीसाठी पालिकेकडे सोपवली आहेत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -