घरदेश-विदेशइंजिन बिघाडामुळे मिग - २७ लढाऊ विमान कोसळले

इंजिन बिघाडामुळे मिग – २७ लढाऊ विमान कोसळले

Subscribe

राजस्थानच्या जोधपूरमध्ये वायुसेनेचे विमान कोसळले. वायुसेनेच्या मिग- २७ लढाऊ विमान कोसळले आहे. नियमित सरावा दरम्यान ही घटना घडली आहे. सिरोही जिल्ह्यातल्या शिवगंज येथे ही घटना घडली आहे. घटनास्थळावर पोलीस आणि वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, इंजिन बिघाडामुळेच हे विमान कोसळले असल्याचे भारतीय वायुसेनेने स्पष्ट केले आहे. या विमानाचा पायलट सुखरुप असून विमान कोसळते वेळी पॅराशूटच्या सहाय्याने तो खाली उतरला. रविवारी सकाळी मिग- २७ हे लढाऊ विमान जोधपूरवरुन आपल्या नियमित वेळेनुसार सरावासाठी निघाले असताना ते कोसळले. या वर्षातली मिग लढाऊ विमान कोसळल्याची ही तिसरी घटना आहे.

- Advertisement -

१२ फेब्रुवारीला मिग – २७ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली होती. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली होती. रामदेवरा गावाच्याजवळ शेतामध्ये हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये विमानाचा पायलट सुरक्षित वाचला. विमान कोसळत असताना पायलटने पॅराशूटच्या मदतीने स्वत:चा जीव वाचवला. या दुर्घटनेप्रकरणाची न्यायालयिन चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

८ मार्चला राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय वायुदलाचे विमान कोसळले होते. मिग – २१ या विमानाला अपघात झाला होता मात्र विमानाचा पायलट सुदैवाने वाचला होता. हे विमान बिकानेरच्या रिहायशी भागात शेतात कोसळले. लढाऊ विमान मिग – २१ हे विमान कोसळण्याआधी पालयटने पॅराशूट घेऊन उडी मारली त्यामुळे तो वाचला. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवितहानी झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -