घरमुंबईडीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरील बंदी कायम

डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरील बंदी कायम

Subscribe

मुंबई हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. पाला संघटनेने दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. परवानगी देण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे.

गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि डॉल्बी बंदच राहणार आहे. डॉल्बी आणि डीजेला परवानगी मिळावी यासाठी पाला संघटनेने याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली. या याचिकेवर अंतिम सुनावणी ४ आठवड्यांनी होणार आहे.

- Advertisement -

दुष्परिणामांमुळे परवानगी नाकारली

गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या मोठ्या आवाजाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारली आहे. याविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड आणि लाइटनिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने बंदी कायम ठवली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे आणि डॉल्बी वाजवता यावे यासाठी राज्यातील गणेश मंडळांचे या सुनावणीकडे लक्ष लागले होते. मात्र डीजे आणि डॉल्बीमुंळे होणाऱ्या त्रासाला लक्षात घेता हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बी वाजवण्याची परवानगी नाकारत बंदी कायम ठेवली आहे.

गणेश मंडळ नाराज

मुंबई हायकोर्टाच्या या सुनावणीमुळे यंदाची गणेश विसर्जन मिरवणुक डीजे आणि डॉल्बी मुक्त असणार आहे. कारण आता या याचिकेवरील अंतिम सुनावणी ४ आठवड्याने होणार आहे. हायकोर्टाने परवानगी नाकारल्यामुळे गणेश मंडळ नाराज झाली आहेत. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीचा आवाज निचे राहणार आहे. त्याचसोबत यंदाची नवरात्र देखील डीजे आणि डॉल्बी मुक्त राहण्याची शक्यता आहे. कारण नवरात्रीनंतर मुंबई हायकोर्टात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -