घरदेश-विदेशउत्तराखंडमध्ये गायीला 'राष्ट्रमातेचा' दर्जा

उत्तराखंडमध्ये गायीला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा

Subscribe

उत्तराखंडामध्ये गायीला 'राष्ट्रमाते'चा दर्जा देण्यात आला आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं उत्तराखंड हे पहिल राज्य ठरलं आहे.

भारतात गायीला खूप महत्त्व दिले जाते. धार्मिक ग्रंथामध्ये गायीचा अनेकदा उल्लेख देखील करण्यात आला आहे. परंतु हे महत्त्व भारतापूर्तच मर्यादीत राहिलेले नसून इतर देशातही भारताला महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे. उत्तराखंडामध्ये गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा देण्यात आला आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं उत्तराखंड हे पहिल राज्य ठरलं आहे. बुधवारी उत्तराखंडमधील विधानसभेत सर्वसहमतीने विधेयक मंजूर झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून आता हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

का दिला गायीला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा

गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करत असल्याचं म्हटलं जात त्यामुळे गायीला केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही खूप महत्त्व दिल जात आहे. गायीला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा दिल्याने गायींच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलता येतील. शिवाय गोहत्या देखील थांबतील. त्यामुळेच गायीला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा देण्यात येत आहे.  – रेखा आर्या, उत्तराखंड पशूपालन मंत्री

विरोधी पक्षाची टीका

उत्तराखंडमध्ये गायीला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी देखील विरोधी पक्षाने या निर्णयावर टीका केली आहे. आम्ही सर्वच जण गायीचा सन्मान करतो. पण गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन भाजपला नेमकं काय सिद्ध करायच आहे असा सवाल विरोधी पक्षाने केला आहे. राज्यातील बऱ्याच गोशाळांची स्थितीअत्यंत वाईट आहे. तर काही ठिकाणी लोक गायींना सोडून देतात. त्यांचा सांभाळ करत नाहीत. त्याचप्रमाणे राज्यात पशू दवाखान्यांचीही कमतरता देखील आहे. – इंदिरा ह्रदयेश, विरोधी पक्षनेत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -