घरमुंबई‘ब्रॉन्को पल्मनरी हॅमरेज’मुळे चांदणी शेखचा मृत्यू

‘ब्रॉन्को पल्मनरी हॅमरेज’मुळे चांदणी शेखचा मृत्यू

Subscribe

चांदणी शेख या गोवंडीतील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीचा शुक्रवारी सकाळी रक्ताच्या उलट्या केल्यानंतर मृत्यू झाला. मात्र तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नव्हतं. शुक्रवारी रात्री उशिरा तिचा पोस्टमार्टम अहवाल जे. जे. हॉस्पिटलमधून आला असून ‘ब्रॉन्को पल्मनरी हॅमरेज’ म्हणजेच फुप्फुसात रक्तस्त्राव असं तिच्या मृत्यूचं कारण देण्यात आलं आहे.

गोवंडीच्या शिवाजीनगर येथे राहणाऱ्या चांदणी शेख या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी चांदणीने रक्ताच्या उलट्या केल्यानंतर तिचा आकस्मित मृत्यू झाला. पण, तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नव्हतं. शुक्रवारी रात्री उशिरा तिचा पोस्टमार्टम अहवाल आला. त्या अहवालात ‘ब्रॉन्को पल्मनरी हॅमरेज’ म्हणजेच ‘फुप्फुसात रक्तस्त्राव’ असं मृत्यूचं कारण देण्यात आलं आहे. शिवाय, याबाबतचा अंतिम अहवाल आल्यानंतरच निष्कर्ष काढण्यात येणार असल्याचं ही जे.जे. रुग्णालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पॅनलने तिचे शवविच्छेदन करून त्याचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. त्यामुळे या मुलीला फुप्फुसाशी संबंधित आजार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, या अहवालाचे रासायनिक विश्लेषण आणि हिस्टो पॅथेलॉजिकल एक्झामिनेशन रिपोर्ट आल्यानंतरच नक्की काय तो निष्कर्ष काढला जाणार आहे.

वाचा – चांदणीच्या मृत्यूचे गूढ !

४९६ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज

औषधबाधेच्या संशयातून शुक्रवारी आणि शनिवारी मिळून एकूण ५०१ मुलं राजावाडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी ४९६ विद्यार्थ्यांची तापसणी करुन आणि औषधं देऊन सोडून देण्यात आलं आहे. तर, अजूनही ५ जणांवर राजावाडीत उपचार सुरू असल्याचं राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितलं आहे.

शनिवारी जवळपास ३० मुलं दाखल झाली होती. त्यातील २५ मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ५ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या ५ मुलांपैकी एका मुलामध्ये डेंग्यूची लक्षणे आढळली आहेत. तो रुग्णालयात आल्यानंतर तपासणी केल्यानंतर गोळ्यांनी अफेक्टेड नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पण, त्याला ताप होता. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर लक्षात आलं की, थोडीफार डेंग्यूची लक्षणे आहेत. म्हणून त्याला रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात आलं आहे. तर, अन्य ४ मुलांना ताप, खोकला, जुलाब अशी लक्षणे आहेत. अशी एकूण ५ मुलं सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

डॉ. विद्या ठाकूर ,वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय

- Advertisement -

वाचा – राजावाडी रुग्णालयात एका गोळीचा गोंधळ

या कारणावरुन पालकांमध्ये होता गोंधळ

गोवंडीच्या उर्दू शाळेत शिकणाऱ्या चांदणी शेख या विद्यार्थिनीचा शुक्रवारी रक्ताची उलटी होऊन मृत्यू झाल्यामुळे या परिसरातील आणि शिकणाऱ्या सर्व मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शाळेत नेमक्या कोणत्या गोळ्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात? यावर पालकांनी प्रश्न उपस्थित केला होता. आपल्या मुलांनाही बरं वाटत नाही या संशयातून पालकांनी राजावाडी रुग्णालयात आपल्या मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी केली. चांदणीच्या मृत्यू अहवालानंतरच तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणावरुन झाला हे स्पष्ट होणार होतं. त्यानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा डॉक्टरांनी चांदणीच्या मृत्यूचा अहवाल दिला. त्यात तिचा फुप्फुसाच्या रक्तस्त्रावातून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

गोळ्यांचे नमुने ‘एफडीए’कडे

चांदणीच्या मृत्यूनंतर पालकांमध्ये औषधाविषयी गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिली जाणारी औषधे आणि खिचडी तपासणीसाठी एफडीएकडे पाठवण्यात आली आहेत. तसंच तोपर्यंत ही औषधे संपूर्ण मुंबईतील कोणत्याही शाळेत दिली जाऊ नयेत असे आदेशही पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे औषधांचा अहवाल येईपर्यंत या गोळ्यांचे वितरण बंद राहणार आहे. तसंच, या गोळ्यांची वैद्यकीय आणि औषधचाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल आठवडाभराने देण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -