घरमुंबईप्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी पबमध्ये फायरिंग

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी पबमध्ये फायरिंग

Subscribe

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी अंधेरीतील पबमध्ये एक व्यापाऱ्याने हवेत फायरिंग केली. त्या व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रियकर कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. आपल्या लाडक्या व्यक्तीला सुखद धक्का देण्यासाठी कोणी सरप्राईज डिनर डेट प्लॅन करत तर कोणी फुलांचा मोठ्ठा गुच्छ देतं. मात्र मुंबईत एका प्रेम वेड्याने प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी चक्क पबमध्ये फायरिंग केली. पानीपथ येथील एका व्यापाऱ्याने मंगळवार, २६ जून रोजी अंधेरीतील एका पबमध्ये फायरिंग केल्याची घटना घडली आहे. राकेश जगदिश कारला नामक या व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांना तसेच त्याच्या दोन्ही अंगरक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोलीस त्याची प्रेयसी नीशाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश यांनी प्रेयसीसमोर पबमध्ये बंदूकीतून ५ से ६ राऊंड फायर केले आहेत.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे पबच्या सात कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एकूण पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आयपीची सेक्शन ३३६, २०२ आणि शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सात कर्मचाऱ्यांना फायरिंगची माहिती पोलिसांना दिली नसल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

३२ रिव्हॉल्व्हल, १२ बोअर रायफल्स जप्त 

राकेश कारला हे त्यांच्या मित्रांसोबत प्रेयसी नीशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री दीडच्या सुमारास पबमध्ये गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कारला हा एका मंत्र्याचा मुलगा असून त्याला शस्त्रासह पबमध्ये येण्याची परवानगी आहे. तसेच त्याच्या अंगरक्षकांनाही बंदूक बाळगण्याची मुभा आहे. त्या रात्री तब्बल ५ लाख खर्च कारला यांनी केला असल्याचे पबच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. नीशाच्या वाढदिवसाचा केक कापताना कारला यांनी हवेत पाच वेळा फायरिंग केली, असेही त्यांनी नमूद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून टोयोटा फॉर्च्युनर, मर्सिडीससह सहा अत्याधुनिक हत्यारे जप्त केल्या आहेत. यामध्ये दोन ३२ रिव्हॉल्व्हर आणि १२ बोअर रायफल्सचा समावेश आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -