घरमुंबईपश्चिम द्रुतगती मार्गावर कारला भीषण आग

पश्चिम द्रुतगती मार्गावर कारला भीषण आग

Subscribe

पश्चिम द्रुतगती मार्गावर चालत्या कारला भीषण आग लागली. या आगीमुळे दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.

पश्चिम द्रुतगती मार्गावर चालती कारने अचानक पेट घेतला. या आगीत ही कार जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाची गाडी दाखल झाली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या आगीत जिवितहानी झाली होती का? या संदर्भात माहिती अजून मिळालेली नाही. याशिवाय, गाडीला आग लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सध्या मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडींची समस्या निर्माण होते. दरम्यान, एका कारला लागलेल्या आगीमुळे या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -