घरमुंबई४७ वर्षीय पुरुषाच्या अवयवदानाने दिले तिघांना जीवदान

४७ वर्षीय पुरुषाच्या अवयवदानाने दिले तिघांना जीवदान

Subscribe

४७ वर्षीय पुरुषोत्तम भिडे यांच्या अवयवदानामुळे तिन जणांना जीवनदान मिळाले आहे. पुरुषोत्तम भिडे यांचे यकृत, किडनी आणि कॉर्निया हे अवयवदान करण्यात आले. त्यापैकी दोन्ही किडन्या सैफी हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आल्या. यकृत ज्युपिटरमधील एका ३३ वर्षीय मुलाला दान करण्यात आलं.

एका ४७ वर्षीय पुरुषाच्या अवयवदानामुळे तीन जणांना नव्याने जगण्याची संधी मिळाली आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मुंबईतील या वर्षाचं ३८ वं अवयवदान झालं आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात राहणारे पुरुषोत्तम भिडे (बदललेलं नाव) हे २१ तारखेला आपल्या कामासाठी भिवंडीत कामासाठी गेले होते. पण, अचानक त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आणि अतिरक्तस्त्राव झाला. अशाच परिस्थितीत खूप वेळ ते असेच रस्त्यावर पडून होते. काही काळानंतर त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू केले. पण, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ तारखेला डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं.

यकृत ३३ वर्षीय मुलाला दान

पुरुषोत्तम भिडे यांच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत माहिती होती. पण, ते कसं आणि कुठे करतात? याची माहिती नसल्याकारणाने ज्युपिटर हॉस्पिटलच्या समन्वयकांनी नातेवाईकांची भेट घेत अवयवदानाबाबत मार्गदर्शन केलं. त्यानुसार, नातेवाईकांनी अवयवदानासाठी परवानगी दिली. पुरुषोत्तम भिडे यांचे यकृत, किडनी आणि कॉर्निया हे अवयवदान करण्यात आले. त्यापैकी दोन्ही किडन्या सैफी हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आल्या. यकृत ज्युपिटरमधील एका ३३ वर्षीय मुलाला दान करण्यात आलं. तर, कॉर्निया ठाण्यातील सय्यारा आय बँकमध्ये देण्यात आले.या महिन्यातील १५ दिवसांत आतापर्यंत ३ कॅडेव्हर डोनेशन झालं असून हे ३८ वं अवयवदान असल्याची माहिती झेडटीसीसीकडून देण्यात आली आहे.

अपघातात जखमी झालेल्या या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी ब्रेनडेड घोषित केलं गेलं. कुटुंबाला अवयवदानाबाबत माहिती दिल्यानंतर कुटुंबाने अवयवदानासाठी परवानगी दिली. झेडटीसीसीच्या नियमावलीनुसार, या व्यक्तीचे यकृत ज्युपिटर हॉस्पिटलमधील रूग्णाला तर दोन्ही किडनी मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आल्या आणि डोळे ठाण्यातील नेत्रपेढीत दान करण्यात आलेत.
-अनिरूद्ध कुलकर्णी, ज्युपिटर हॉस्पिटलमधील समन्वयक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -