घरमुंबईकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड; 'म.रे'ची वाहतूक विस्कळीत

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड; ‘म.रे’ची वाहतूक विस्कळीत

Subscribe

इंजिनातील बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याने अप जलद मार्गावरील लोकल उशिराने धावणार

ऐन कार्यालयीन वेळेत कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मस्जिद स्थानकाजवळ कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक रखडल्याने जलद मार्गावरील गाड्या खोळंबल्या आहेत. वेळेवर कामाला पोहोचण्यास निघालेले प्रवासी, चाकरमान्य़ांना या इंजिन बिघाडाचा चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आपल्या नियोजित वेळेत कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये पोहोचणे शक्य न झाल्याने प्रवाशांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान बिघाड दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मस्जिद स्थानकाजवळ कोकणकन्या एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जलद मार्गावरच्यागाड्या खोळंबल्या आहेत. #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 25, 2019

- Advertisement -

छत्रपती शिवाजी टर्मीनसकडे येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात अचानक बिघाड झाल्याने ही गाडी जागीच उभी राहिली. याच मार्गावर एक्सप्रेसच्यामागे जलद लोकल खोळंबल्या आहेत. यामुळे सीएसएमटी ते मस्जिद स्थानकांदरम्यान जलद मार्गावर लोकलच्या रांगा लागल्याने सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांना रुळांवरून चालत रेल्वे स्थानकापर्यंत जावे लागले. इंजिनातील बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याने अप जलद मार्गावरील लोकल उशिराने धावणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -